शिराढोणमध्ये डिजिटलवरून तणाव

By Admin | Published: July 30, 2014 12:31 AM2014-07-30T00:31:45+5:302014-07-30T00:54:52+5:30

शिराढोण : चौकात लावलेले डिजिटल काढल्याने नागरिकांना चिथावणी देत पोलिस ठाण्यात आलेल्या ५२ जणाविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Stress on digital in Shireadhn | शिराढोणमध्ये डिजिटलवरून तणाव

शिराढोणमध्ये डिजिटलवरून तणाव

googlenewsNext

शिराढोण : चौकात लावलेले डिजिटल काढल्याने नागरिकांना चिथावणी देत पोलिस ठाण्यात आलेल्या ५२ जणाविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मंगळवारी दुपारी शिराढोण (ताक़ळंब) येथे घडली असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे़
पोलिसांनी सांगितले की, शिराढोण येथील एजाज उर्फ काका डांगे, बशीर डांगे, वाजीद डांगे, बबलू शेख, नजीम पठाण, बशीर शेख, समीर पठाण, दाऊद पठाण, कलीम दखणी, डांगे, किझर फारूखी, मुद्दू पटेल व इतर ३० ते ४० जणांनी मंगळवारी दुपारी संभाजी चौकात जमाव गोळा केला़ तेथे लावलेले डिजिटल का काढले असे म्हणत गोंधळ घालून इतरांना चिथावणी देत सोबत घेऊन पोलिस ठाणे गाठले़ आक्षेपार्ह व बाधक डिजिटल लावत दोन समाजात तेढ निर्माण करीत लोकांना चिथावणी देऊन जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पो.ना. सुधीर तुगावकर यांनी शिराढोण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून वरील ५२ जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या प्रकरणाचा अधिक तपास बीट अंमलदार जाधव हे करीत आहेत़ दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी उपाययोजना केल्याचे पोलिसांनी सांगितले़ (वार्ताहर)
गोविंदपुरात महिलेचा विनयभंग
शिराढोण : महिलेचा विनयभंग करणाऱ्याविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना गोविंदपूर (ताक़ळंब) येथे मंगळवारी घडली़ याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गोविंदपूर येथील एक महिला मंगळवारी पाणी भरत असताना गावातील बाळू उर्फ बाळासाहेब मुंडे याने तिच्या हाताला धरून विनयभंग केला़ महिलेने आरडाओरड करताच तिस शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब मुंडे याच्याविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोना अण्णा कदम, बाबूराव चव्हाण हे करीत आहेत़
उमरगा येथे भावंडांना मारहाण
उस्मानाबाद : दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून भावंडांना मारहाण करणाऱ्याविरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास उमरगा येथील एमएसईबी झोपडपट्टीजवळ घडली़पोलिसांनी सांगितले की, उमरगा येथील एमएसईबी झोपडपट्टी येथील मुस्तफा कादरसाब नदाफ (वय-२६) यांना राजू तारासिंग राठोड याने दारू पिण्यासाठी पस्ैो मागण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत हातातील विळ्याने मारहाण करून गंभीर जखमी केले़ मुस्तफा नदाफ यांचा भाऊ सोडविण्यासाठी आला असता त्यालाही शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ मुस्तफा नदाफ यांच्या फिर्यादीवरून राठोड याच्याविरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि हालसे हे करीत आहेत़

Web Title: Stress on digital in Shireadhn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.