विद्यार्थ्यांना 'डिटीबी'चे पैसे मिळेनात; एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन
By राम शिनगारे | Published: July 4, 2023 07:55 PM2023-07-04T19:55:02+5:302023-07-04T19:55:22+5:30
यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यालयाच्या वऱ्हाड्यांतच ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.
छत्रपती संभाजीनगर : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत पात्र विद्यार्थ्यांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील पैसे विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. त्याशिवाय अनेक विद्यार्थ्यांचे स्वयंमचे अर्जच मंजुर केलेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. हे पैसे तात्काळ 'डिबीटी'द्वारे देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.
विद्यार्थ्यांनी एकात्मकी आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांची थकीत संपूर्ण रक्कम डीबीटीद्वारे तात्काळ देण्यात यावी, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही मंजुर केलेले नाहीत, त्याचे अर्ज मंजूर करावेत, स्वयंम योजनेची डीबीटीच्य शासन निर्णयाप्रमाणे पूर्तता वेळेवर करावी आणि कार्यालयातील स्वयंम विभागातील अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यालयाच्या वऱ्हाड्यांतच ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात विद्यार्थी सुभाष गावीत, कुशल वसावे, युवराज पाडवी, राहुल वळवी, राजेंद्र वळवी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्प अधिकाऱ्यांचे आयुक्तांकडे मागणी
एकात्मकी आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी नाशिक येथील आदिवासी विभागाच्या आयुक्तांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी जमा झालेली नसल्यामुळे विद्यार्थी तगादा लावत आहेत. त्यामुळे डीबीटी जमा करण्यासाठी आयुक्त स्तरावरून कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे.