चौकट :
वर्गात बसवून पत्रकारिता नाही शिकविता येत. सांगलीचा पूर, अण्णा हजारे यांचे आंदोलन अशा अनेक ठिकाणी आजवर आम्ही विद्यार्थ्यांना पाठविले आहे. यामुळे मुलांना नवा अनुभव मिळतो आणि माध्यमे जे सांगत आहेत, जे मनावर थोपवत आहेत, ते खरोखर तसेच आहे काय, हे जाणून घेण्याची संधी मिळते. एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो.
- प्रा. डाॅ. रेखा शेळके
प्राचार्या
चौकट :
किसान आंदोलन अनुभवण्याचा प्रसंग खूपच रोमांचक होता. त्या लोकांचे प्रश्न खूपच वेगळे आहेत, हे तेथे जाऊन समजले. राजकारणी वगळता शेती आणि शेतकरी या नात्याने बांधले गेलेले सर्व लोक तेथे त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात. आंदोलन अतिशय नियोजनबद्ध असून न भूतो न भविष्यती अशाच शब्दांत आंदोलनाचे वर्णन करावे लागेल.
- अमोल डोईफोडे, विद्यार्थी.