औरंगाबाद : मुंबईतील नायर रुग्णालयात कार्यरत आणि मूळचे औरंगाबादचे डॉ. भीमसंदेश तुपे यांच्या आत्महत्येने त्यांच्या डॉक्टर मित्रांना मोठा धक्का बसला आहे. अतिशय अभ्यासू आणि नेहमी रुग्णांना मदत करणारा जाॅली माणूस होता. तो असे काही काही करून अचानक निघून जाईल, असे वाटले नव्हते, अशी हळहळ डॉक्टर मित्रांनी व्यक्त व्यक्त केली.
डॉ. भीमसंदेश तुपे यांनी स्वत:ला विषारी इंजेक्शन टाेचून आत्महत्या केल्याची माहिती मंगळवारी मित्रांपर्यंत पोहोचली. अनेकांना क्षणभर विश्वासही बसला नाही. डॉ. तुपे हे मूळचे औरंगाबादचे असून भूलशास्त्र (अनस्थेशिया) या विषयात पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबईला आले होते. त्यांचे मित्र डॉ. निलेश रोजेकर यांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, शहरातील नंदनवन काॅलनी परिसरात त्यांचे निवासस्थान आहे. अकरावी, बारावी आणि सीईटी परीक्षेपर्यंत आम्ही सोबतच होतो. नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर घाटी रुग्णालयात काही महिने सीएमओ म्हणून कामही केले. त्यानंतर ते मुंबईला गेले. आम्ही दोघे नेहमी संपर्कात होतो. अतिशय मनमिळावू स्वभाव होता. भीमसंदेश अतिशय चांगला मित्र होता. रुग्णांना मदतीसाठी नेहमी प्रयत्न करायचे. त्यांचे भाऊदेखील डॉक्टर आहे. या घटनेची त्यांच्या आई-वडिलांना उशीरापर्यंत कल्पना दिली नव्हती. त्यांचे भाऊ मुंबईला गेले.
घाटीतूनही हळहळ
या घटनेची माहिती मिळताच घाटीतील डॉक्टरांनीही हळहळ व्यक्त केली. आपल्यासोबत डॉ. भीमसंदेश तुपे हे तुपे होते, असे काहींनी सांगितले.