लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सुटी लागताच मुलांना विविध छंदवर्गांना टाकण्याची अनेक पालकांची इच्छा असते; पण नेमके कोणत्या क्लासला टाकावे, ते क्लास कुठे आहेत, याविषयी माहिती नसते. विविध छंदवर्गांपासून ते अगदी केजी टू पीजीपर्यंत सर्वच शैक्षणिक क्लासेसची माहिती देणारा आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरणारा भव्य समर कॅम्प एक्स्पो आणि मिशन अॅडमिशनचे लोकमत भवन येथे दि. ६ ते ८ एप्रिलदरम्यान भव्य आयोजन करण्यात आले आहे.लोकमत लॉन येथे होणाऱ्या या प्रदर्शनात आयसीएसई, सीबीएसई, स्टेट बोर्ड यासारख्या नामांकित शाळा सहभागी झाल्या आहेत. के्रयॉन्स स्कूलतर्फे किड्स झोन तयार करण्यात येणार आहे. जम्पिंग, जायंट व्हील, मॅसकॉट, मेरिगो राऊंड यासारखे खेळ यादरम्यान असतील. राजा रवी वर्मा चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध कला पाहायला मिळतील. रांगोळीकार महेश दोरवट पाटील थ्रीडी कार्टूनच्या रांगोळ्या काढतील. सर्व क्लासेसची माहिती देणा-या या प्रदर्शनात आपल्या पाल्यासह आवर्जून भेट द्या. शाळेच्या स्टॉल बुकिंगसाठी ९६७३७५९५८५, ९९२१४८११४७ व हॉबी स्टॉल बुकिंगसाठी संपर्क- ९०७५०९८०३६, ९९२१०३०७००.कॅम्पस क्लब वार्षिक लकी ड्रॉदि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. कॅम्पस क्लब वार्षिक लकी ड्रॉ काढण्यात येईल. ज्यामध्ये एम स्टार डान्स इन्स्टिट्यूटतर्फे ३ सायकल्स, सी. के. स्पोर्टस्च्या वतीने १० बॅडमिंटन रॅकेट, १० क्रिकेट बॅट, मंगलारप प्रिंटस्च्या वतीने २५ टी शर्टस्, गो डॉट प्रिन्टस्च्या वतीने ३५ वॉटर बॉटल्स, गिटार एन गिग्जतर्फे १ गिटार व साईकृपा फ्रेम यांच्यातर्फे १० फे्रम्स देण्यात येतील.एच टू ओ मध्ये धमाल आणि चांदीचे नाणे जिंकण्याची संधीप्रदर्शनाला ३ दिवस भेट देणाºया १५ भाग्यवान विजेत्यांना भारुकाज एच टू ओ वॉटर पार्क तर्फे प्रवेश कूपन व लिटिल एन्जल स्कूलतर्फे पाच भाग्यवान विजेत्यांना चांदीचे नाणे दिले जाईल.समर कॅम्प एक्स्पोमध्ये असणार काय?स्केटिंग, नृत्य, गिटार, क्रिकेट, बुद्धिबळ, स्वीमिंग, सुंदर हस्ताक्षर, व्यक्तिमत्त्व विकास, गायन, मेमरी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश, कॉम्प्युटर, चित्रकला, अबॅकस, करिअर गाईडन्स आणि यासोबतच विविध क्लासेसची माहिती.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक असणारे समर कॅम्प एक्स्पो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:18 AM