स्वरूपा कोठावळे हिची गोल्डन हॅट्ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:59 AM2017-12-08T00:59:01+5:302017-12-08T00:59:24+5:30
औरंगाबादची उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू स्वरूपा कोठावळे हिने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली. विशेष म्हणजे स्वरूपा कोठावळे हिचे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतील हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले आहे.
औरंगाबाद : औरंगाबादची उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू स्वरूपा कोठावळे हिने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली. विशेष म्हणजे स्वरूपा कोठावळे हिचे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतील हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले आहे.
शारदा मंदिर प्रशालेतील दहावी इयत्तेत शिक्षण घेणाºया स्वरूपा कोठावळे हिने १७ वर्षांखालील ३५ किलो वजन गटात अंतिम फेरीत तामिळनाडूच्या खेळाडूला धूळ चारत सुवर्णपदकांवर शिक्कामोर्तब केले. अंतिम फेरीत धडक मारण्याआधी तिने आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब आणि हरियाणाच्या खेळाडूवर दणदणीत विजय मिळवला. स्वरूपा कोठावळे हिने याआधी २०१५ मध्ये पुणे आणि २०१६ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. स्वरूपा कोठावळे हिला लता कलवार, प्रवीण बोरसे, प्रवीण कुमार, गजेंद्र गवंडर, सूरजसिंग, आशिष बनकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल औरंगाबाद जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष के.डी. शार्दूल, राज्य संघटनेचे सदस्य नीरज बोरसे, सचिव लता कलवार, किशोर लव्हेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, संतोष सोनवणे, शरद तिवारी, अमोल थोरात, योगेश विश्वासराव, चंद्रशेखर जेऊरकर, डोनिका रूपारेल, अविनाश नलावडे, राजू जाधव आदींनी स्वरूपा कोठावळे हिचे अभिनंदन केले आहे.