सणासुदीत आरोग्य सांभाळा, पावडर अन् पाम तेलात बनवलेला खवा वेळीच ओळखा 

By साहेबराव हिवराळे | Published: October 6, 2023 05:59 PM2023-10-06T17:59:37+5:302023-10-06T18:06:26+5:30

अन्न व औषध प्रशासनाची मोहीम चालूच राहणार

Take care of your health during the festive season, identify the food made in powder and palm oil in time | सणासुदीत आरोग्य सांभाळा, पावडर अन् पाम तेलात बनवलेला खवा वेळीच ओळखा 

सणासुदीत आरोग्य सांभाळा, पावडर अन् पाम तेलात बनवलेला खवा वेळीच ओळखा 

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवात अन्न व औषध प्रशासनाने शहरातील अनेक मिठाई दुकानांत नमुने घेऊन खव्याची तपासणी केली. काही नमुन्यांचा तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही. सध्या संशयास्पद परिस्थिती नसल्याचे सांगितले जाते. तथापि, सणासुदीची मोहीम चालूच राहणार आहे, असे अन्न व औषध प्रशासनाचे म्हणणे आहे.

अन्न व औषध प्रशासनाची मोहीम
अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत सणासुदीच्या अनुषंगाने गणेशोत्सवाच्या कालावधीत दूध, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक, मिठाई व फरसाण विक्रेते इ. आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या. आस्थापनांची तपासणी करताना स्वच्छतेचे निकष, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरात येणारे कच्चे व तयार अन्नपदार्थांचा दर्जा यांसारख्या बाबींची पडताळणी करण्यात आली.

खवा, मिठाई, मोदक नमुने जप्त
मोहिमेअंतर्गत एकूण २३ आस्थापनांची तपासणी करण्यात येऊन खवा, मोदक, मिठाई यांसारख्या अन्नपदार्थांचे एकूण १९ नमुने घेण्यात आले.

मिठाई घेताना काय पाहाल?
आरोग्याच्या दृष्टीने तयार केलेल्या मिठाईसमोर तयार केलेली दिनांक आणि त्याची गुणवत्ता पाहूनच मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी केली जावी. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही. याची दक्षता नेहमी ग्राहकांनी घेतलीच पाहिजे.

दोषीवर कारवाई
गणेशोत्सव काळात खवा, मोदक, मिठाई यांसारख्या अन्नपदार्थांचे १९ नमुने घेण्यात आले. सदर नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई घेण्यात येईल. ग्राहकांनी मिठाई घेताना वापराचा कालावधी बघून खरेदी करावी. ग्राहकांनी दुग्धजन्य पदार्थ, मिठाई यांसारख्या अन्नपदार्थांची योग्य तापमानावर साठवणूक करावी.
- निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी

Web Title: Take care of your health during the festive season, identify the food made in powder and palm oil in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.