तापमानाची नीचांकी, पारा ८.० अंशांखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:39 PM2018-12-20T22:39:34+5:302018-12-20T22:40:35+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी तापमानाने यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी गाठली. हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी तापमानाने यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी गाठली. हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले.
उत्तरेकडील थंड वाºयाचा जोर वाढला आहे. शिवाय तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या वादळामुळे थंडीमध्ये चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील इतर शहरांप्रमाणे औरंगाबादही चांगलेच गारठले आहे. शहरात गेल्या तीन दिवसांत तापमान ३ अंशांनी घसरले आहे. आतापर्यंतचे सर्वात कमी ८.९ अंश तापमान बुधवारी नोंदविल्या गेले होते. परंतु शहरातील तापमानामध्ये गुरुवारी आणखी घट झाली. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान २८.२ तर किमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले. शहरात यंदाच्या ऋतूतील हे सर्वात कमी तापमान ठरले. त्यामुळे शहरात थंडीची लाट आल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. गारठून टाकणाºया थंडीने सायंकाळनंतर अनेक रस्ते निर्मनुष्य होत आहेत. आगामी काही दिवसांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.