औरंगाबाद : अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र आणि सून दीप्ती गांधी यांच्यासह प्रदीप परदेशी, योगेश चिपाडे आणि चंद्रशेखर बोराटे यांची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. एम. जामदार यांनी सोमवारी (दि.२६) दिला.अहमदनगर महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांपैकी छाननीदरम्यान नामनिर्देशनपत्रे नामंजूर केलेल्या दहा उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यांच्यापैकी वरील पाच उमेदवारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.वरील सर्व याचिकाकर्त्यांच्या याचिका प्रलंबित असून, खंडपीठाने प्रतिवादी राज्य निवडणूक आयोग, महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आणि आक्षेप घेणारे यांना नोटिसा बजावण्याचा अंतरिम आदेश दिला. या याचिकांवर सहा आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांच्या छाननीदरम्यान अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकाम, घरावर उभारलेला मोबाईल टॉवरच्या कराच्या थकबाकीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विविध पक्षांच्या दहा उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे नामंजूर केली होती. म्हणून त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ पी. एम. शहा आणि व्ही. डी. होन, अॅड. आश्विन होन, अॅड. आबासाहेब श्ािंदे, अॅड. नितीन गवारे आदींनी काम पाहिले. हस्तक्षेपक पटवेकर आणि गिरीश जाधव यांच्या वतीने अॅड. गिरीश थिगळे (नाईक) आणि राज्य निवडणूक आयोगातर्फे अॅड. शिवाजी टी. शेळके यांनी काम पाहिले.
अहमदनगर महापालिका निवडणुकीतील पाच इच्छुकांना तात्पुरता दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:58 PM
अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र आणि सून दीप्ती गांधी यांच्यासह प्रदीप परदेशी, योगेश चिपाडे आणि चंद्रशेखर बोराटे यांची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. एम. जामदार यांनी सोमवारी (दि.२६) दिला.
ठळक मुद्देसुवेंद्र आणि दीप्ती गांधी यांच्यासह प्रदीप परदेशी, योगेश चिपाडे आणि चंद्रशेखर बोराटे यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा