नियमांचे उल्लघंन करणाऱ्या मोंढ्यातील दहा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:02 AM2021-05-21T04:02:52+5:302021-05-21T04:02:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पैठण : लॉकडाऊनच्या अनुषंगाने ठरवून दिलेली वेळेची मुदत संपल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या ...

Ten traders have been booked for violating the rules | नियमांचे उल्लघंन करणाऱ्या मोंढ्यातील दहा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

नियमांचे उल्लघंन करणाऱ्या मोंढ्यातील दहा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पैठण : लॉकडाऊनच्या अनुषंगाने ठरवून दिलेली वेळेची मुदत संपल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या कांदा मार्केटवर पोलीस व नगर परिषदेच्या संयुक्त पथकाने बुधवारी कारवाई केली. दुकाने सुरू ठेवणाऱ्या दहा व्यापाऱ्यांवर पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन संदर्भात नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिला.

कोरोना निर्बंधात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ७ ते ११ या मर्यादित कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु, काही व्यापारी व दुकानदार वेळेची मर्यादा न पाळता, सर्रासपणे दिवसभर दुकाने सुरू ठेवत असल्याने खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडून लॉकडाऊनच्या उद्देशाला हरताळ फासत आहेत. बुधवारी दुपारी पैठण पोलीस व नगर परिषदेचे पथक गस्त घालत असताना बाजार समितीच्या मोंढ्यात कांदा मार्केट सुरू असून, तेथे मोठ्या संख्येने ग्राहकांनी गर्दी केल्याचे धक्कादायक चित्र पथकाला पाहायला मिळाले.

या दुकानदारांवर झाला गुन्हा दाखल

शुभम काला, हमीद बागवान, नाथा ढाकणे, सलीम बागवान, शेहराज बागवान, महादेव ढाकणे, राहुल पाटणी, केदारनाथ सर्जे यांची दुकाने बाजार समितीत होती तर कोर्ट रोडवरील साई टायरच्या मालकाविरोधात कारवाई करून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोपाळ पाटील, मुकुंद नाईक, मनोज वैद्य, अरुण जाधव, कल्याण ढाकणे, समादेशक राजू कोटलवार यांनी केली.

Web Title: Ten traders have been booked for violating the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.