रेल्वेस्टेशनवर सापडले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
औरंगाबाद : दिल्लीहून सचखंड एक्सप्रेसने शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांची तीन दिवसांपासून रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात येत आहे. मंगळवारी महापालिकेच्या पथकाने १६९ आरटीपीसीआर, १२१ अँटीजेन टेस्ट केले त्यामध्ये चारजण पॉझिटिव्ह आढळून आले. चिकलठाणा विमानतळावर पहिल्याच दिवशी २६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
१२७१ नागरिकांची कोरोना तपासणी
औरंगाबाद : शहरात कोरोना तपासणीसाठी महापालिकेने १६ केंद्र उभारले आहेत. याशिवाय पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांची तपासणी करण्यात येते. मंगळवारी दिवसभरात १२७१ संशयित नागरिकांची तपासणी करण्यात आली. ४७५ नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली असता त्यामध्ये तब्बल ६५ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. ७९६ नागरिकांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.