सर्वांची कसोटी ! दहावी-बारावीच्या एप्रिलमध्ये होणार प्रात्यक्षिक परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:46 PM2021-03-09T12:46:09+5:302021-03-09T12:48:14+5:30

SSC and HHC Practival Exam माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लेखी परीक्षा एप्रिल ते मे दरम्यान होणार आहेत.

Test everyone! The practical examination will be held in April 10th-12th | सर्वांची कसोटी ! दहावी-बारावीच्या एप्रिलमध्ये होणार प्रात्यक्षिक परीक्षा

सर्वांची कसोटी ! दहावी-बारावीच्या एप्रिलमध्ये होणार प्रात्यक्षिक परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्दे दहावीच्या परीक्षेसाठी यावर्षी १ लाख ८३ हजार ६११ तर बारावीच्या १ लाख ५१ हजार ८४७ विद्यार्थीगर्दी टाळण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार बॅचचे नियोजन करण्याच्या सूचनाही राज्य मंडळाने दिल्या

औरंगाबाद : सुरक्षित अंतर, मास्कसह विविध कोरोनासंबंधीच्या उपाययोजना करून दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासंबंधी राज्य मंडळाने सूचना दिल्या आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ५ ते २२ एप्रिल तर दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या १२ ते २८ एप्रिलदरम्यान होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेत कसोटी लागणार आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लेखी परीक्षा एप्रिल ते मे दरम्यान होणार आहेत. त्यापूर्वी विद्यार्थी सुरक्षेची काळजी घेत बाह्य परीक्षकांची नेमणूक करून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांत कोरोनाचे नियम पाळून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी यावर्षी १ लाख ८३ हजार ६११ तर बारावीच्या १ लाख ५१ हजार ८४७ अशा एकूण ३ लाख ३५ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा सुरक्षित पार पाडण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार बॅचचे नियोजन करण्याच्या सूचनाही राज्य मंडळाने दिल्या आहेत, असे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Test everyone! The practical examination will be held in April 10th-12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.