औरंगाबाद : नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी शासनाने काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी शासकीय रुग्णालयात ‘अंतरा’ नावाचे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले; परंतु प्रचार -प्रसार आणि माहितीअभावी त्याचा अत्यल्प वापर होतो आहे. घाटीसह जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अवघ्या ३८२ महिलांनी हे इंजेक्शन घेतल्याचे समोर आले आहे.दिल्लीहून आलेल्या चार सदस्यीय पथकाने सोमवारी (दि.२२) जिल्हा सामान्य रुग्णालय आणि घाटी रुग्णालयाला भेट देऊन ‘अंतरा’ इंजेक्शनचा आढावा घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी पथकाला जिल्ह्यातील माहिती दिली. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत ८० महिलांनी हे इंजेक्शन घेतले आहे. या पथकाने आढावा घेतल्यानंतर समाधान व्यक्त केल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.प्रसूतीनंतर सहा आठवड्यांनंतर ‘अंतरा’ हे इंजेक्शन घेता येते. त्यानंतर दर तीन महिन्याला इंजेक्शन घ्यावे लागते. गर्भनिरोधक गोळी घेण्याचे अनेकदा विसरते. त्यातून महिलांना अनावश्यक गर्भधारणेला सामोरे जावे लागते, त्यामुळे गर्भनिरोधक ‘इंजेक्शन’ महिलांसाठी उपयुक्त ठरत असल्याने आरोग्य विभागाकडून ते मोफत उपलब्ध करून देण्यात आले. त्याचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.घाटीत सर्वाधिक प्रमाणघाटी रुग्णालयात प्रसूतीशास्त्र विभागालाही या पथकाने भेट दिली. यावेळी विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी पथकाला माहिती दिली. एकट्या घाटी रुग्णालयात एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत ३०२ महिलांनी हे इंजेक्शन घेतले आहे.
गर्भनिरोधक इंजेक्शनकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:24 PM
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी शासनाने काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी शासकीय रुग्णालयात ‘अंतरा’ नावाचे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले; परंतु प्रचार -प्रसार आणि माहितीअभावी त्याचा अत्यल्प वापर होतो आहे. घाटीसह जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अवघ्या ३८२ महिलांनी हे इंजेक्शन घेतल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्दे३८२ महिलांनी घेतले इंजेक्शन : केंद्रीय पथकाकडून घाटी, जिल्हा रुग्णालयात आढावा