ख्रिस्त जयंतीनिमित्त यंदा मध्यरात्रीची आराधना नाही; ठराविक अंतराने होणार अल्पावधीच्या प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 06:20 PM2020-12-24T18:20:06+5:302020-12-24T18:21:45+5:30
परंपरेनुसार २४ डिसेंबरला होणारी मध्यरात्रीची आराधना यावर्षी होणार नाही. मध्यरात्री ऐवजी सायंकाळी ही आराधना होणार आहे.
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या वर्षाच्या ख्रिस्त जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे. परंपरेनुसार २४ डिसेंबरला होणारी मध्यरात्रीची आराधना यावर्षी होणार नाही.
मध्यरात्री ऐवजी सायंकाळी ही आराधना होणार आहे. त्याचप्रमाणे २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या एकाच सामुदायिक प्रार्थना ऐवजी सकाळपासून ठराविक अंतराने अल्पावधीच्या प्रार्थना होतील . ख्राईस्ट चर्चमध्ये २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६:४० आणि ७ ते ७:४० दरम्यान आणि २५ डिसेंबरला सकाळी ७ ते ७:४० आणि ८ ते ८:४०, ९ ते ९:४०, १० ते १०:४०, ११ ते ११:४० आणि दुपारी १२ ते १२:४० दरम्यान प्रार्थना होईल. रेव्ह.रंजन राठोड आणि रेव्ह. एस. एस. बत्तीसे प्रार्थना घेतील.
सेंट फिलिप चर्चमध्ये २४ डिसेंबरला सायंकाळी ६:३० वाजता आणि २५ डिसेंबरला सकाळी ८ आणि १०:३० वाजता प्रार्थना होईल. रेव्ह. सुशील घुले, रेव्ह. विलास नाडे, रेव्ह. अक्षय घुले आणि रेव्ह. अनंत खंडागळे प्रार्थना घेतील .
सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॅथिड्रल येथे २४ डिसेंबरला सकाळी ६ वाजता इंग्रजीत आणि ८ वाजता मराठीत पवित्र मिस्सा बलिदान होईल. २५ डिसेंबरला सकाळी ६:३० ला इंग्रजीत, ७:३० ला मराठीत आणि ८:३० ला इंग्रजीत पवित्र मिस्सा बलिदान होईल.
न्यू लाईफ मुव्हमेंट इंटरनॅशनल तर्फे पैठण गेट येथे इंग्रजीत पास्टर संजय निर्मल, हिंदीत रॉयल कोर्ट येथे पास्टर जोसेफ श्रीसुंदर आणि स्टेशन रोड येथे पास्टर नितीन श्रीसुंदर प्रार्थना घेतील.