चर्चा तर होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:02 AM2021-08-25T04:02:17+5:302021-08-25T04:02:17+5:30
आम्ही जशास तसे उत्तर देऊ शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री हे घटनात्मक ...
आम्ही जशास तसे उत्तर देऊ
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री हे घटनात्मक पद आहे. त्या पदाचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे राणेंना जशास तसे उत्तर शिवसेना आक्रमकपणे देईल.
आ. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख
मुख्यमंत्र्याबाबत बोलणे हा वेडेपणा
मुख्यमंत्री ठाकरे यांचा देशात गौरव होतो. अशा प्रतिभावंत नेतृत्वाविरोधात बोलणे हे वेडेपणाचे लक्षण आहे. त्यांना शिवसेनेने दोन वेळा पराभूत केले आहे. त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यांना जनताच त्यांची खरी जागा दाखवेल.
राजू वैद्य, विधानसभा संघटक
मंत्र्याला असे वक्तव्य शोभत नाही
राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्या पदावर काम करीत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात चुकीचे वक्तव्य करणे शोभत नाही. अशिक्षित माणसाला पदाची गरिमा काय समजणार? याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतील.
विजय वाघचौरे, शहरप्रमुख, शिवसेना
भाजपने राणे यांना आवरावे
राणे यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे, त्याचे परिणाम तर त्यांना भोगावे लागतीलच. त्यांना भाजपने आवरले पाहिजे. नाहीतर आज रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे, भविष्यात भाजप कार्यालयात घुसून आंदोलन केले जाईल.
हनुमान शिंदे, जिल्हाप्रमुख, युवासेना