मराठवाडा तहानला; २५ लाख नागरिकांना टँकरचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:55 AM2019-02-21T11:55:37+5:302019-02-21T11:59:47+5:30
विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे.
औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कधी नव्हे एवढे टँकर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस विभागात सुरू असून, १३८७ टँकरने आठ जिल्ह्यांतील २५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. येणाऱ्या आठ दिवसांत १५०० च्या आसपास टँकरचा आकडा जाईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला. १ हजार ५८ गावांत, ३४१ वाड्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या आहे.
विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. १२ लाख ५६ हजार ८७० नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात आहे. ३९९ विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहित) घेतल्या आहेत.
त्याखालोखाल बीड जिल्ह्यात ६ लाख २८ हजार ६१ नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ६०२ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार ६२१ गावांना टँकरने पाणी दिले जात आहे. ३०१ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. सध्या १३२४ टँकर खाजगी कंत्राटदार संस्थांचे असून, उर्वरित ६३ टँकर शासकीय आहेत. मोठ्या प्रमाणात टँकर लॉबीवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागते आहे. परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत टँकरची संख्या कमी असली तरी आगामी काळात ती वाढण्याची शक्यता आहे.
विभागातील गावनिहाय सुरू असलेले टँकर व अधिग्रहित विहिरी :
जिल्हा लोकसंख्या गावे/वाड्या टँकर विहिरींचे अधिग्रहण
औरंगाबाद १२ लाख ५६ हजार ७०९ ७०७ ३९९
जालना ३ लाख ८५ हजार १८३ २१९ ३०१
परभणी ७ हजार ४३८ ०३ ०३ ६२
हिंगोली १८ हजार ७८९ ०७ ११ ३९
नांदेड ३९ हजार ९२६ २५ १८ १७
बीड ६ लाख २८ हजार ४२६ ३९६ ६०२
लातूर १० हजार ४४० ०३ ०२ १२७
उस्मानाबाद ६२ हजार २३ २३ ३१ ३०३
एकूण अंदाजे २५ लाख १३९९ १३८७ १८५०