तीसगावात ३०० ग्रामस्थांची नेत्रतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 09:59 PM2019-11-29T21:59:19+5:302019-11-29T21:59:29+5:30
नागसेन बुद्ध विहारात शुक्रवारी संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले.
वाळूज महानगर: तीसगाव येथील नागसेन बुद्ध विहारात शुक्रवारी संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. यात ३०० जणांची तपासणी करण्यात आली.
नागसेन बुद्ध विहार व लायन्स क्लब नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात डॉ. सय्यद जुबेर अली, डॉ. जावेद अली, डॉ. संतोष मंजुळे, डॉ. विशाल सुरडकर आदींनी नेत्र रुग्णांची तपासणी केली.
कार्यक्रमाला संयोजक अविनाश मोरे, अंजन साळवे, संजय जाधव, सोमनाथ महापुरे, राणुजी जाधव, बाबूराव दाभाडे, किशोर साळवे, सिद्धार्थ मोरे, अण्णा जाधव, बिजू कानडे आदी उपस्थित होते.
शिबीर यशस्वीतेसाठी लता मोरे, सीता तरैयावाले, रमाबाई दाभाडे, अत्तरबी शेख, कडूबाई मोरे, छाया महापुरे, अरुणा जाधव, मनोरमा मोरे, सविता महापुरे, सुशिला कानडे आदींनी परिश्रम घेतले.