दीड तासाच्या विमान प्रवासासाठी तीन तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:48 PM2019-07-03T23:48:10+5:302019-07-03T23:49:03+5:30

मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईत हवाई वाहतूक विस्कळीत झाली. त्यात स्पाईस जेटचे विमान घसरल्याने मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. बुधवारीदेखील दीड तासाच्या प्रवासासाठी एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाच्या प्रवाशांना जवळपास तीन तास वाट पाहावी लागली.

Three hours for a one-and-a-half-hour flight | दीड तासाच्या विमान प्रवासासाठी तीन तास

दीड तासाच्या विमान प्रवासासाठी तीन तास

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई-औरंगाबाद विमान : दुसऱ्या दिवशीही विलंब, मुंबईतील पावसाचा परिणाम


औरंगाबाद : मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईत हवाई वाहतूक विस्कळीत झाली. त्यात स्पाईस जेटचे विमान घसरल्याने मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. बुधवारीदेखील दीड तासाच्या प्रवासासाठी एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाच्या प्रवाशांना जवळपास तीन तास वाट पाहावी लागली.
एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान दुपारी ३.२५ वा. उड्डाण करते. हे विमान औरंगाबादला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास येते. या ठिकाणाहून हे विमान सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण घेते. सायंकाळी ७.१० वाजता हे विमान दिल्लीत पोहोचत असते.
मुंबईत स्पाईस जेटचे विमान घसरल्याच्या घटनेनंतर मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. पर्यायी धावपट्टीवर विमाने उतरविण्यात आली. काही आंतरराष्ट्रीय विमानांचा मार्ग बदलण्यात आला. या विमानांना बंगळुरू, अहमदाबादसह अन्य विमानतळांवर उतरविण्यात आले. हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईहून औरंगाबादला येणाºया विमानाला सलग दुसºया दिवशीही विलंब झाला.
विमान प्रवासासाठी प्रवाशांना उड्डाणाच्या एक तास आधी येऊन आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. दुपारी ३.२५ ऐवजी सायंकाळी ६ वाजता मुंबई-औरंगाबाद-दिल्ली विमान उड्डाण करणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. मुंबईतील पावसाच्या परिणामामुळे विमानाला विलंब झाल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दोन रेल्वे रद्द
मुंबईतील पावसामुळे बुधवारी मुंबईला जाणारी नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस आणि सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईला जाण्याचे नियोजन केलेल्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

Web Title: Three hours for a one-and-a-half-hour flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.