संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळातील महिला वाहकांना १८० दिवसांच्या प्रसूती रजेबरोबर तीन महिने अतिरिक्त प्रसूती रजा देण्याचे परिपत्रक महामंडळाने शुक्रवारी (दि.२३) काढले. त्यामुळे सात महिन्यांपूर्वी झालेल्या घोषणेची अखेर अंमलबजावणी होणार असून, हजारो महिला वाहकांना दिलासा मिळणार आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला.एसटी महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने १४ जुलै २०१७ रोजी समोर आणताच एकच खळबळ उडाली. याविषयी तीव्र पडसाद उमटले. याविषयी ‘लोक मत’ने सतत पाठपुरावा के ला. अखेर एसटी महामंडळातील हजारो महिला कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळातील महिला कर्मचाºयांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच बाळाच्या संगोपनासाठी ३ महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आॅगस्टमध्ये केली.महिला कर्मचाºयांना २६ आठवडे प्रसूती रजा दिली जाते. बहुतांश महिला मुलाच्या जन्मानंतर संगोपनासाठी ही रजा घेतात. काही महिलांना प्रसूतीपूर्व विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे नियमित रजेबरोबरच अतिरिक्त तीन महिन्यांची रजा देण्याच्या नव्या निर्णयामुळे यापुढे ही दुर्दैवी वेळ कोणावरही ओढावणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त झाली. परंतु अनेक महिने उलटूनही प्रशासनाकडून परिपत्रक निघत नसल्यामुळे अतिरिक्त रजेची अंमलबजावणीच होत नव्हती. परिणामी महिला कर्मचाºयांतून संताप व्यक्त होत होता. अखेर शुक्रवारी एसटी महामंडळाने परिपत्रक काढून तीन महिन्यांच्या अतिरिक्त प्रसूती रजेस मंजुरी देण्याची अंमलबजावणी क रण्याची सूचना केली.या नव्या निर्णयाच्या परिपत्रकाचे महिला वाहकांनी स्वागत केले असून, यापुढे गरोदरपणातील त्रास कमी होईल, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. महिला वाहकांना गरोदरपणाच्या पहिल्या चार महिन्यांपर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे, शैक्षणिक अर्हतेनुसार बैठे काम देण्याचा निर्णय विभागीय पातळीवर घेण्यात येईल. काही ठरावीक महिन्यांपर्यंत सुरक्षित असलेल्या मार्गांवर काम देण्याचा निर्णय आगार व्यवस्थापक घेतील.निर्णयाचे स्वागतअतिरिक्त रजेची घोषणा होऊन आता त्याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक निघाले आहे, याचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयाच्या अंमलबजावणीने राज्यभरातील सर्व महिला वाहकांना फायदा होईल. यासंदर्भात ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला. यासोबतच आता या निर्णयाची अंमलबजावणी सर्वच महिला कर्मचाºयांसाठी व्हावी, असे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे म्हणाल्या.
तीन महिने अतिरिक्त प्रसूती रजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:48 PM
एसटी महामंडळातील महिला वाहकांना १८० दिवसांच्या प्रसूती रजेबरोबर तीन महिने अतिरिक्त प्रसूती रजा देण्याचे परिपत्रक महामंडळाने शुक्रवारी (दि.२३) काढले. त्यामुळे सात महिन्यांपूर्वी झालेल्या घोषणेची अखेर अंमलबजावणी होणार असून, हजारो महिला वाहकांना दिलासा मिळणार आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला.
ठळक मुद्देलोकमत इफेक्ट : परिपत्रक जाहीर, एसटी महामंडळातील महिला वाहकांना अखेर दिलासा