कागदी पिशव्या तयार करण्याचे महिलांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 09:20 PM2018-12-27T21:20:45+5:302018-12-27T21:20:58+5:30
वाळूज येथे गुरुवारी महिलांसाठी कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले होते.
वाळूज महानगर: वाळूज येथे गुरुवारी महिलांसाठी कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले होते.
पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पोलिस व नागरिकांत सुसंवाद राहावा तसेच महिला व बेरोजगार-तरुण तरुणींनी रोजगारांची संधी निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पंधरा दिवसांपूर्वी वाळूज पोलिस ठाणे, धवल क्रांती रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊडेंशन व वाळूज ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली होती.
या उपक्रमांर्गत गुरुवारपासून महिलांना कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरवात करण्यात आली. याचा शुभारंभ पोलीस निरीक्षक सतीश टाक, सहायक पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमात प्रशिक्षक भारध्वज कुलकर्णी, ऋषीकेश देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमांतर्गत महिलांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या बाजारपेठेत विक्री करण्यासाठी पोलिस प्रशासन मदत करणार असल्याचे महिलांना सांगण्यात आले.