लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ राज्य कृती समितीच्या वतीने ११ सप्टेंबरपासून राज्यभरात संप अद्याप सुरूच आहे. अंगणवाडी कार्यालयास कुलूप लावून बंद पाळण्यात येत असल्याने बालके सकस आहारापासून वंचित आहेत. आज संपाचा चोविसावा दिवस असून अद्याप याबाबत तोडगा निघाला नाही.अंगणवाडीत कुणाच्या विश्वासावर बालकांना पाठवावे, असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला जात आहे. आशा स्वयंसेवकांनी आणि बचत गटांच्या महिलांनीही पोषण आहार न वाटण्याचा निर्णय घेतल्याचे कृति समितीकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता ग्रा. पं. च्या ग्रामशिक्षण समितीकडून आहार वाटपाचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांनी केली आहे. ज्यामुळे चिमुकले सकस आहारापासून वंचित राहणार नाहीत. संपामुळे राज्यातील जवळपास ७४ लाख बालके सकस आहार योजनेपासून वंचित राहत आहेत.
अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाचा चोविसावा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:36 AM