शेतीसाठी ड्रेनेजमधून पाणी घेणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 04:28 PM2019-03-18T16:28:23+5:302019-03-18T16:30:57+5:30

ड्रेनेजचे पाणी चोरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या मनपा पथकावर दगडफेक करण्यात आली होती

Two farmers who take water from the drainage for agriculture die due to electric shock | शेतीसाठी ड्रेनेजमधून पाणी घेणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू 

शेतीसाठी ड्रेनेजमधून पाणी घेणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू 

googlenewsNext

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेमधून शेतीसाठी चोरून वीज आणि पाणी घेताना तीन शेतकऱ्यांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज, सोमवारी (दि. १८ ) दुपारी २ वाजेच्या सुमारास पावरलूम परिसरात घडली. यासोबतच चार शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. 

हर्सूल परिसर ते झाल्टापर्यंत महानगरपालिकेच्या भूमिगत गटार योजनेतून शहराचे सांडपाणी वाहते. यातील पाण्यावर काही शेतकरी शहराच्या आसपासच्या भागात शेती करतात. पावरलूम परिसरात अशाच प्रकारे ड्रेनेजचे पाणी चोरून शेती केली जाते. आज दुपारी या भागातील ड्रेनेज लाईनवरील चेंबरवर लावलेल्या पाण्याच्या मोटारीस दुरुस्त करताना तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या चार शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच नागरिकांनी सुद्धा बचावकार्य सुरु केले आहे. जनार्दन विठ्ठल साबळे (55), दिनेश जगन्नाथ दराखे (40, दोघे रा. चिकलठाणा) व रामेश्वर केरुबा डांबे (रा.निकलक, ता. बदनापूर,जालना )  अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. मृतामधील रामेश्वर यांचा मृतदेह अद्याप मिळाला नाही. तर रामकिसन माने , उमेश कावडे, प्रकाश केरुबा वाघमारे आणि नवनाथ रंगनाथ कावडे (रा. चिखलठाणा ) या चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटनेने खळबळ उडाली आहे. 

मनपा पथकावर केली होती दगडफेक 
मागील काही दिवसांपासून शहराच्या जवळील शेतीसाठी भूमिगत गटारीमधून शेतकरी पाणी चोरत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली. न्यायालयाने याची नोंद घेत महानगरपालिकेने या शेतकऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी असे आदेश दिले. यानुसार महानगरपालिकेची पथक दोन वेळेस या भागात कारवाईसाठी गेले होते. मात्र, शेतकऱ्याने दगडफेक केल्याने पथकाला माघार घ्यावी लागली होती. 

Web Title: Two farmers who take water from the drainage for agriculture die due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.