रांजणगावात रस्त्यासाठी अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:14 PM2019-09-05T23:14:19+5:302019-09-05T23:14:26+5:30

रस्त्याच्या दुरावस्था झाल्यामुळे गुरुवारी महिला व नागरिकांनी अनोखे आंदोलन केले.

 Unique agitation for road in Rangangaon | रांजणगावात रस्त्यासाठी अनोखे आंदोलन

रांजणगावात रस्त्यासाठी अनोखे आंदोलन

googlenewsNext

वाळूज महानगर : रांजणगावच्या त्रिमूर्ती कॉलनीतील रस्त्याच्या दुरावस्था झाल्यामुळे गुरुवारी महिला व नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महिलांनी रस्त्यावर साड्या बांधून ग्रामपंचायतीचा निषेध केला.


या वसाहतीतील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे त्रिमूर्ती कॉलनीतील रस्त्यावर पाणी साचले असून, नागरिक व वाहनधारकांना चिखल तुडवतच ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वार व वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्यामुळे अपघात वाढले आहेत. या भागातील रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला आहे.

मात्र ग्रामपंचायतीकडून रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. गतवर्षीही शिवसेनेच्या वतीने गाढवांच्या मदतीने गावातील खड्डे बुजविण्याची मागणी केली होती.

मात्र, अनेक वसाहतीतील रस्त्याचा प्रश्न निकाल न निघाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन -तीन दिवसांपूर्वीही सेनेचे विभाग प्रमुख कैलास हिवाळे, शहर प्रमुख रावसाहेब भोसले, जावेद शेख, भगवान साळुंके, विशाल काळे, बंडु तरटे, अर्जुन जाधव, अशोक लोहकरे आदींनी गावातील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करुन ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला होता.

ग्रामपंचायत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिक व वाहनधारकात नाराजीचा सूर आहे.

Web Title:  Unique agitation for road in Rangangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज