आॅक्सिजन सिलिंडरच्या आवाजाने घाटीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:32 AM2017-12-10T00:32:56+5:302017-12-10T00:33:00+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वॉर्ड २४ मध्ये शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला आणि स्फोटाच्या अफवेने एकच गोंधळ उडाला.

 Valley of the Oxygen Cylinders | आॅक्सिजन सिलिंडरच्या आवाजाने घाटीत गोंधळ

आॅक्सिजन सिलिंडरच्या आवाजाने घाटीत गोंधळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वॉर्ड २४ मध्ये शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला आणि स्फोटाच्या अफवेने एकच गोंधळ उडाला. यावेळी नातेवाईकांनी दाखल बालकांना घेऊन वॉर्डाबाहेर पळ काढला. पाहता पाहता घाटीत आॅक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची अफवा पसरली.
लहान मुलांचे वॉर्ड क्रमांक २४ मध्ये दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका चिमुकल्याच्या व्हेंटिलेटरचे आॅक्सिजन सिलिंडर बदलले जात होते. सिलिंडर बदलताना थोडाफार आवाज होतो; परंतु यावेळी हा आवाज काहीसा मोठा असल्याचे समजते. शिवाय आजूबाजूच्या रुग्णांच्या नातेवाईकांपैकी काहींनी प्रथमच असा आवाज ऐकला. त्यामुळे स्फोटाची अफवा पसरली. यावेळी एका नातेवाईकाने स्फोट झाल्याची आरडाओरड करीत बाहेर धाव घेतली. हे पाहून इतरांनीही त्याच्यापाठोपाठ धाव घेतली आणि एकच गोंधळ उडाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. राहुल पांढरे, डॉ. अनिल पुंगळे आदींनी रुग्णांची समजूत काढली. घाटीतील मेडिसिन विभागात सेंट्रल आॅक्सिजन सिस्टिम आहे. येथे एका टँकमधून अतिदक्षता व आयसीसीयू, ‘एमआयसीयू’ला आॅक्सिजन पुरवठा केला जातो. सर्जिकल इमारतीमधील आॅपरेशन थिएटरमध्ये आॅक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक टँक आहे. तिथे करण्यात येणाºया तांत्रिक कामांमुळे आवाज येण्याचा प्रकार घडला. थेट लिक्विड आॅक्सिजनच्या टँकमधून पुरवठा झाल्यास ही कसरत कमी होईल, अशी अपेक्षा कर्मचाºयांकडून व्यक्त होत आहे.

Web Title:  Valley of the Oxygen Cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.