वंदे भारत एक्स्प्रेसला गायीची धडक; इंजिनमध्ये बिघाड, अर्धा तास खोळंबा
By संतोष हिरेमठ | Published: January 13, 2024 07:57 PM2024-01-13T19:57:21+5:302024-01-13T19:58:57+5:30
वंदे भारत एक्स्प्रेस पोटूळहून निघाल्यानंतर अचानक समोर गाय आली
छत्रपती संभाजीनगर : मुंबई - जालना वंदे भारत एक्स्प्रेसला गाय धडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी लासूर ते पोटूळदरम्यान घडली. या धडकेनंतर वंदे भारत एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले. जवळपास अर्धा तास ही रेल्वे जागेवरच उभी होती.
वंदे भारत एक्स्प्रेस पोटूळहून निघाल्यानंतर अचानक समोर गाय आली. रेल्वेची गायीला जोरदार धडक बसली. या घटनेत इंजिनमध्ये बिघाड झाला. ब्रेक पाईसह इतर नूकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जवळपास अर्धा तासानंतरही ही रेल्वे पुढे रवाना झाली. छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर या रेल्वेची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर दाखल झाली. काही दिवसांपूर्वीच ताशी १०० कि.मी.च्या वेगाने धावणारी मुंबई- जालना वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका बोगीतील सायरन वाजून रेल्वे जागेवरच थांबली होती. प्रवाशाने सिगारेट ओढल्याने हा प्रकार झाल्याने समोर आले होते.