पहिल्याच दिवशी ६२ जणांना दिले र्र्र्ई-चालान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:04 AM2019-04-03T00:04:41+5:302019-04-03T00:04:59+5:30
औरंगाबाद : वाहतूक नियम मोडून वाहने पळविणाऱ्यांविरोधात मंगळवारपासून ई-चालान देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ६२ वाहनचालकांना ई-चालान देऊन त्यांच्याकडून ...
औरंगाबाद : वाहतूक नियम मोडून वाहने पळविणाऱ्यांविरोधात मंगळवारपासून ई-चालान देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ६२ वाहनचालकांना ई-चालान देऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.
पोलीस आयुक्त कार्यालयासमोरून विना हेल्मेट दुचाकी पळविणाऱ्याला पकडून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते त्याला पहिले ई-चालान देण्यात आले. यावेळी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंढे, पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्यासह वाहतूक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. वाहतूक नियमांचा भंग करणाºया वाहनचालकांना थेट ई-चालान देण्यास सुरुवात झाली. वाहतूक नियम मोडणाºयांकडून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड स्वॅप करून जागेवर दंड वसूल करण्यात आले. पोलीस आयुक्तालयांतर्गत पाच वाहतूक शाखा कार्यरत असून, प्रत्येक शाखेला २० ई-चालान मशीन देण्यात आल्या. वाहतूक विभागातील सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३२९ वाहतूक कर्मचाºयांना ई-चालानचे प्रशिक्षण देण्यात आले.
पोलीस आयुक्तांनी दिले पाचशे रुपये
विना हेल्मेट दुचाकी चालकाला पकडल्यानंतर त्यास ई-चालानचे पाचशे रुपये तडजोड रक्कम म्हणून भरण्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. तेव्हा त्याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे पोलिसांना सांगितले. ही रक्कम एटीएम कार्ड, डेबिट कार्डद्वारे भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने त्याच्याकडे एटीएम कार्डच नसल्याचे नमूद केले. त्याची हतबलता पाहून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी त्यांच्या पाकिटातील पाचशे रुपये काढून त्याचे ई-चालान फाडले.
काय आहे ई-चालानमध्ये
वाहनचालकास पकडल्यानंतर ई-चालान यंत्रात वाहनाचा क्रमांक, वाहनचालकाचे लायसन्स क्रमांक, संपूर्ण नाव, पत्ता, वाहतूक नियम मोडल्याचे ठिकाण, वेळ आणि तारीख याबाबतची माहिती वाहतूक पोलीस नोंदवतील. त्यानंतर ही माहिती ई-चालान सॉफ्टवेअरमध्ये कायमस्वरूपी साठवून ठेवली जाईल. परिणामी वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकाने किती वेळा नियम मोडले हे एका क्लीकवर पोलिसांना दिसणार आहे.