शहर पोलीस अ चा मनपावर संघावर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:00 AM2017-12-08T01:00:41+5:302017-12-08T01:01:35+5:30

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक टी-२० करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस अ संघाने मनपा संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुसºया सामन्यात आयआयए संघाने एमआर इलेव्हन संघावर ६ गडी राखून मात केली. आयआयएचा शुभम हरकळ आणि शहर पोलीसचा राहुल जोनवाल हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

Victory sounding on the city police A Manpavar Sangh | शहर पोलीस अ चा मनपावर संघावर दणदणीत विजय

शहर पोलीस अ चा मनपावर संघावर दणदणीत विजय

googlenewsNext
ठळक मुद्दे शुभम हरकळ, राहुल जोनवाल सामनावीर


औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक टी-२० करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस अ संघाने मनपा संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुसºया सामन्यात आयआयए संघाने एमआर इलेव्हन संघावर ६ गडी राखून मात केली. आयआयएचा शुभम हरकळ आणि शहर पोलीसचा राहुल जोनवाल हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
सकाळच्या सत्रात मनपा संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १२३ धावा केल्या. त्यांच्याकडून अल्ताफ खान याने ५ चौकार, एका षटकारासह नाबाद ५०, कर्मवीर लव्हेराने २२, दीपक जावळेने १७ व सचिन लव्हेराने १२ धावा केल्या. शहर पोलीसकडून संजय पाटील व शेख जिलानी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलीसने विजयी लक्ष्य १६.५ षटकांत २ फलंदाज गमावून गाठले. त्यांच्याकडून राहुल जोनवाल याने ३ षटकार व ७ चौकारांसह नाबाद ६८ व कर्णधार गिरिजानंद भक्त याने १ चौकार व एका षटकारासह नाबाद २७ धावा केल्या. शेख मुकीमने १४ धावा केल्या. मनपाकडून प्रवीण क्षीरसागर व रईस अहमद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसºया लढतीत एमआर इलेव्हनने २० षटकांत ८ बाद १५४ धावा केल्या. त्यांच्याकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येत अनिरुद्ध शास्त्री याने २७ चेंडूंत ४ षटकार व ५ चौकारांसह नाबाद ५६, अब्दुल गफूरने ३९ धावा केल्या. आयआयएकडून समीर यादव व मिर्झा मसूद यांनी प्रत्येकी २, तर अनंत नेरळकर व रझा कुरैशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात आयआयए संघाने विजयी लक्ष्य १७.५ षटकांत ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून शुभम हरकळ याने ६३ चेंडूंत ६ षटकार व ८ चौकारांसह नाबाद ९० धावांची तडाखेबंद खेळी केली. अनंत नेरळकरने २०, युसूफ शेखने १३ धावा केल्या. एमआर इलेव्हनकडून अनिरुद्ध शास्त्रीने २, तर ईशांत रायने १ गडी बाद केला.

Web Title: Victory sounding on the city police A Manpavar Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.