वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात मातृ-पितृ पूजन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आई-वडील व गुरुजनाचे पूजन करून त्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या.
गरवारे कम्युनिटी सेंटरवाळूज येथील गरवारे कम्युनिटी सेंटरच्या वतीने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र संचालक सुनील सुतवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख मिथिन चव्हाण, लालासाहेब चौधरी, वर्षा ढेपे, आशा गोरडे उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थी व मुलांनी आपल्या आई-वडिलाचे पूजन करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. सूत्रसंचालन व आभार मिथिन चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण कुलकर्णी, रामेश्वर वल्ले व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
तनवाणी विद्यालय, बजाजनगरप्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलाचे विशेष महत्व असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापिका राजर्षी कदम यांनी तनवाणी विद्यालयात आयोजित कार्यक्रमात दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना आई-वडिलांवर लिहिलेल्या कवितांचे विद्यार्थ्यांनी वाचन करून आई-वडिलांना भेटवस्तू दिल्या. कार्यक्रमाला संस्थेचे बंटी तनवाणी, हनुमान भोंडवे, अशोक लगड, राजेंद्र माने, पंडित उखळे, रामचंद्र जाधव, मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, श्वेता पवार, सुषमा वानखेडे, अविनाश सोनटक्के, ज्ञानेश्वर साळुंके, ज्योती गोल्हार, अण्णा चव्हाण, जालिंदर लगड आदी उपस्थित होते.
गजानन विद्यालय, रांजणगावयोगवेदांत कृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष आय.जी.जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सुरेखा बसवदे, हनुमंत जाधव उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पालक व शिक्षकांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सूत्रसंचालन गुलाब मोहिते, तर आभार तेजराव तलवार यांनी मानले. कार्यक्रमाला कल्याण कुलकर्णी, परमेश्वर गिते, माधव निरणे, संदीप हिंगणकर, निहाल बेग, संजीवनी चिखले, अनुराधा मुळे, करुणा जैस्वाल,विशाल जाधव, गंगासागर बोºहाडे, शीतल पाटील उपस्थित होते.