मतदान ओळखपत्रही डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:44 AM2017-09-03T00:44:16+5:302017-09-03T00:44:16+5:30

डिजीटलायझेशनच्या जमान्यात निवडणूक विभागानेही बदलाची भूमिका घेतली असून, जुनी ब्लँक अँड व्हाईट ओळखपत्र कालबाह्य करीत आता नव्या रुपात आकर्षक बहुरंगी डिजीटल निवडणूक ओळखपत्र देण्यास प्रारंभ केला आहे़ त्यामुळे निवडणूक ओळखपत्रांवरील छायाचित्रांवरून हिरमुसणाºया मतदारांना आता स्वत:च्या आकर्षक छायाचित्रासह मतदान ओळखपत्र मिळणार आहे़

Voter ID card is digital | मतदान ओळखपत्रही डिजिटल

मतदान ओळखपत्रही डिजिटल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : डिजीटलायझेशनच्या जमान्यात निवडणूक विभागानेही बदलाची भूमिका घेतली असून, जुनी ब्लँक अँड व्हाईट ओळखपत्र कालबाह्य करीत आता नव्या रुपात आकर्षक बहुरंगी डिजीटल निवडणूक ओळखपत्र देण्यास प्रारंभ केला आहे़ त्यामुळे निवडणूक ओळखपत्रांवरील छायाचित्रांवरून हिरमुसणाºया मतदारांना आता स्वत:च्या आकर्षक छायाचित्रासह मतदान ओळखपत्र मिळणार आहे़
निवडणूक विभागाच्या वतीने देशभरातील प्रत्येक मतदाराला ओळखपत्र दिले जाते़ मतदानाचा हक्क बजावताना इपिक नावाचे हे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे़ तसेच इतर शासकीय कामकाजासाठीही मतदान ओळखपत्राचा नेहमी वापर होतो़ मात्र जुन्या रुपातील हे ओळखपत्र देताना अनेकांना मनात रुखरुख वाटत असेल़ ब्लँक अँड व्हाईट आणि ओळखपत्रावरील स्वत:च्याच छायाचित्रावरून ओळखपत्र वापरताना आखडता हात घेतला जात होता़ सध्याच्या डिजीटलायझेशनच्या जमान्यात विविध विभागांकडून आकर्षक ओळखपत्र दिले जात असून, त्यात सर्व प्रथम उपप्रादेशिक परिवहन विभागाने पाऊल टाकत नव्याने डिजिटल वाहन परवाना देण्यास प्रारंभ केला़
त्यानंतर पॅनकार्ड देखील डिजिटल ओळखपत्रामध्ये दिले जावू लागले़ आता त्यात निवडणूक विभागाची भर पडली असून, या विभागाने डिजीटल आणि आकर्षक ओळखपत्र देण्यास प्रारंभ केला आहे़
अंतरिम या एजन्सी अंतर्गत पीव्हीसी इपिक डिलीव्हरी चालन या कंपनीला हे काम देण्यात आले आहे़ सुरुवातीच्या काळात ज्या नव मतदारांनी मतदार यादीत नोंदणी केली, अशा मतदारांना नव्या स्वरुपातील ओळखपत्र दिले जात आहे़ कालांतराने सर्व मतदारांच्या ओळखपत्रात बदल करून देण्याचा मानस आहे़

Web Title: Voter ID card is digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.