जपानी भाषा शिकायची आहे ? बुद्धलेणी येथे उद्यापासून सुरु होतायत मोफत क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 07:00 PM2021-08-28T19:00:53+5:302021-08-28T19:05:51+5:30

Buddha Caves Aurangabad : भारतातील व जपानमधील आंतरराष्ट्रीय उद्योगांत रोजगार मिळण्यास होईल मदत

Want to learn Japanese? Free classes starting tomorrow at Buddha Caves Aurangabad | जपानी भाषा शिकायची आहे ? बुद्धलेणी येथे उद्यापासून सुरु होतायत मोफत क्लास

जपानी भाषा शिकायची आहे ? बुद्धलेणी येथे उद्यापासून सुरु होतायत मोफत क्लास

googlenewsNext
ठळक मुद्देजपानचे हॅपी सायन्सचे बौद्ध धर्मगुरू तकाहिरो एदा हे मार्गदर्शन करणार मोफत वर्ग ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे घेतले जातील.

औरंगाबाद : वर्षावासानिमित्त २९ ऑगस्ट ते ३० ऑक्टोबर दरम्यान मोफत जपानी स्पोकन क्लास, ध्यान व प्रवचन वर्ग आयोजित करण्यात आले असून यासाठी जपानचे हॅपी सायन्सचे बौद्ध धर्मगुरू तकाहिरो एदा हे मार्गदर्शन करणार आहेत. हे क्लासेस बुद्ध लेणीच्या पायथ्याशी धम्मभूमी येथे घेतले जाणार आहेत. ( Want to learn Japanese? Free classes starting tomorrow at Buddha Caves Aurangabad) 

जपान हे सर्वात प्रगत बौद्ध राष्ट्र आहे. या देशाची भाषा आत्मसात केल्यामुळे भारतीय व जपानी सांस्कृतिक मूल्यांची देवाण-घेवाण करण्यास मदत होईल. जपानचा धम्म समजण्यास मदत होईल. भारतातील व जपानमधील आंतरराष्ट्रीय उद्योगांत रोजगार मिळण्यास मदत होईल, हा यामागचा उद्देश असल्याचे भदन्त विशुद्धानंदबोधी महास्थवीर यांनी कळविले आहे.

ध्यान व प्रवचन तसेच जपानी स्पोकन वर्गाचे मराठी, हिंदी, इंग्रजी दुभाषकाचे काम हॅपी सायन्सचे भारतीय प्रमुख सुहास काळवे हे करणार आहेत. हे तिन्ही उपक्रम बुद्ध लेणीच्या पायथ्याशी विहारात दर रविवारी दुपारी २ ते ३ तसेच दर बुधवार आणि शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ यावेळात आठवड्यातून तीन दिवस राहतील. हे मोफत वर्ग ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे घेतले जातील.

रविवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भदन्त विशुद्धानंदबोधी महास्थवीर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होईल. कोविडमुळे ऑफलाइन वर्गामध्ये प्रवेश मर्यादित राहतील. ऑनलाइन वर्गामध्ये अशी कुठलीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे जास्तीत जास्त औरंगाबादकर व महाराष्ट्रातील भाषाप्रेमी व ध्यान साधकांनी उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. भन्ते चंद्रबोधी यांनी केले आहे.

ऑनलाईन-ऑफलाईन सत्रात सहभागी होण्यासाठी bcbodhi@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.

Web Title: Want to learn Japanese? Free classes starting tomorrow at Buddha Caves Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.