आधार कार्ड अपडेट करायचे आहे? आता थेट गाठा गावातील पोस्ट ऑफिस

By साहेबराव हिवराळे | Published: March 2, 2024 06:33 PM2024-03-02T18:33:17+5:302024-03-02T18:34:29+5:30

आधार कार्डसाठी तालुका ठिकाणी किंवा शहरात जाण्याची गावातील व्यक्तीला गरज राहिलेली नाही.

Want to update Aadhaar? Now go directly to Gatha Village Post Office | आधार कार्ड अपडेट करायचे आहे? आता थेट गाठा गावातील पोस्ट ऑफिस

आधार कार्ड अपडेट करायचे आहे? आता थेट गाठा गावातील पोस्ट ऑफिस

छत्रपती संभाजीनगर : आधारशी संबंधित कुठलेही काम आता गावातच पोस्टामध्ये करणे शक्य आहे. यासाठी पोस्टातर्फे विशेष अभियान राबविले जात आहे. जनतेला आधार अपडेट करण्यासाठी अधिकचे पैसे देण्याची गरज नाही. शिवाय त्यांचा वेळ वाचणार आहे. नवीन आधार कार्ड काढणे मोफत असून, नाममात्र शुल्कात आधार अपडेट, लिंक केली जाणार आहेत. यामुळे याचा फायदा ज्येष्ठ नागरिक, कामगार गावातील महिलांना होणार आहे. गावातील पोस्टातच या सुविधा मिळणार आहेत.

गावातील पोस्टातच मिळणार या सुविधा
आधार कार्डसाठी तालुका ठिकाणी किंवा शहरात जाण्याची गावातील व्यक्तीला गरज राहिलेली नाही. आधार कार्डसाठीची होणारी पायपीट आता थांबलेली दिसत आहे. अगदी आपल्या गावातच ही सेवा उपलब्ध करून दिल्याची ग्रामस्थांंना एक खुशखबरच आहे.

नवीन आधार कार्ड : मोफत काढले जाणार
आधार अपडेट :१०० रुपये
आधार लिंकिंग : ५० रुपये

कोणकोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड काढण्यासाठी जन्माचा दाखला, तसेच आई किंवा वडिलांचे आधारकार्ड सोबत आणावे आणि ज्यांचे आधार कार्ड काढायचे आहे, त्यांनी स्वत: येणे गरजेचे आहे. त्याचे नवीन आधार कार्ड मोफत काढण्यात येणार आहे.

आधार काढून दहा वर्षे झाली, अपडेट करा
आधार कार्ड काढून दहा वर्षे झाली असेल आणि ते अपडेट करायचे असल्यास तुम्हाला इतरत्र जाण्याची किंवा जास्तीचे पैसे खर्च करण्याची गरज नाही. पोस्टमनच तुमची कामे करून देणार आहे.

ही तर मदत
पूर्वीसारखे फक्त पोस्टाचे काम राहिलेले नाही. आता पोस्टात सर्वच सेवासुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. आता आधार कार्ड काढणे, अपडेट करणे, बँकिंग अशाही सेवा जनतेसाठी दिल्या आहेत. त्याचा नागरिकांंना फायदा होत आहे. नागरिकांनी सेवासुविधांचा लाभ घ्यावा.
-संजय पाटील, टपाल अधिकारी

Web Title: Want to update Aadhaar? Now go directly to Gatha Village Post Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.