छत्रपती संभाजी नगर : मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटील यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुमारे अर्धा तास मुख्यमंत्र्यांनी विनोद पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली . यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, प्रवक्ता राजू वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून हे महायुतीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. ही जागा शिवसेना शिंदे गट यांच्या कडे आल्यानंतर पाटील यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती .यानंतर चिकलठाणा विमानतळावरही पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती .दरम्यान शिंदे सेनेने विनोद पाटील यांना तिकीट नाकारत जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली. यामुळे विनोद पाटील हे नाराज झाले होते. तशी नाराजी त्यांनी बोलूनही दाखवलि होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आपल्याला तिकीट देण्यास इच्छुक होते मात्र शहरातील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांनी आपल्या उमेदवारीला विरोध केला यामुळे आपल्याला तिकीट मिळाले नाही इच्छुक होते. यावेळी त्यांनी सुमारे अर्धा तास पाटील यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री साबुदाणा खिचडी सेवन केली.
बंद दारावर कुठलीही राजकिय चर्चा नाही - विनोद पाटील मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर विनोद पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट होती. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ताच्या घरी ते आले. यात त्यांचा मोठेपणा आहे. मुख्यमंत्री यांच्या सोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली. मी नाराज नाही.