ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रहायचे कोठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 03:00 AM2020-08-22T03:00:46+5:302020-08-22T03:01:43+5:30

परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी कोठे राहणार, हा प्रश्न उपस्थित होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Where do students from rural areas want to live? | ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रहायचे कोठे?

ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रहायचे कोठे?

googlenewsNext

राम शिनगारे
औरंगाबाद : राज्यातील विविध शहरांमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनची नीट, जेईई, एमपीएससीसह महाविद्यालयीन परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या परीक्षांसाठी ग्रामीण भागात परतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शहरात यावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असणारी शेकडो वसतिगृहे कोविड-१९ सेवेसाठी अधिग्रहित केली आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी कोठे राहणार, हा प्रश्न उपस्थित होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांमधील अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाही, याचा निर्णय आठवड्यात सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. याविषयी राज्य शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये कायद्याची लढाई सुरू आहे. परीक्षा घेण्यावर यूजीसी ठाम असल्यामुळे परीक्षा होण्याची शक्यता अधिक आहे.
याशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा १३ सप्टेंबर, आयआयटीतील प्रवेशासाठीची जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर, एमपीएससीची परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. तसेच राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटीचाही निर्णय आॅगस्टच्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. काही परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
अशी सर्व परिस्थिती असताना कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या शहरातील बहुतांश शैक्षणिक संस्थांची वसतिगृहे, महाविद्यालये कोविड-१९ च्या सेवेसाठी अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. समाजकल्याणसह इतर शासकीय वसतिगृहे १०० टक्के अधिग्रहित आहेत. त्यामुळे गावी परतलेले विद्यार्थी परीक्षेसाठी शहरात येणार असतील तर त्यांनी राहयचे कुठे, असा प्रश्न आहे.
शासनाने अद्यापतरी पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे परीक्षांचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.
>कुठे आणि किती शैक्षणिक वास्तू केल्या अधिग्रहित
कोरोनाबाधितांवर उपचार, विलगीकरण आणि क्वारंटाईन करण्यासाठी अधिग्रहित केलेले शाळा आणि वसतीगृहांची शहरनिहाय आकडेवारी... कोल्हापूर १६, नागपूर २, उस्मानाबाद ३५, सांगली ५, नाशिक २५, अमरावती २४, वाशिम १३, मुंबई ३५, सातारा २०, रत्नागिरी ७४७ शाळा, पुणे २२, नंदुरबार ६, ठाणे ४, यवतमाळ २६, जळगाव ७, अहमदनगर १८, बीड ११, जालना ११ तर औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील ३५ वसतिगृहे, महाविद्यालयांचा समावेश आहे.

Web Title: Where do students from rural areas want to live?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.