मंगळसूत्राला हात घालताच चोरट्याचा शर्ट पकडून ठेवला; महिलेच्या धाडसाने सराईत गुन्हेगार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 07:04 PM2022-01-17T19:04:23+5:302022-01-17T19:14:39+5:30

मंगळसूत्र ओरबाडताच महिलेने चोरट्याचा शर्ट पकडून ठेवला; नागरिकांनी चोप देत दिले पोलिसांकडे

The woman bravely caught the Mangalsutra thief; Citizens were beaten and handed over to the police | मंगळसूत्राला हात घालताच चोरट्याचा शर्ट पकडून ठेवला; महिलेच्या धाडसाने सराईत गुन्हेगार अटकेत

मंगळसूत्राला हात घालताच चोरट्याचा शर्ट पकडून ठेवला; महिलेच्या धाडसाने सराईत गुन्हेगार अटकेत

googlenewsNext

वाळूज महानगर : मोबाइलवर बोलत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला आहे. या महिलेने धाडस दाखवून चोरट्याला पकडल्यानंतर, मदतीसाठी आलेल्या नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना शनिवारी रात्री बजाजनगरात घडली.

भारत राजू गेडवे (२५ रा.वडगाव) असे मंगळसूत्र चोरट्याचे नाव आहे. पुष्पा विजय निकम (४० रा.एस.टी.कॉलनी, बजाजनगर) या शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मोबाइलवर बोलत घरासमोरील रस्त्यावर फेरफटका मारत होत्या. एका संशयित तरुणाने दोन-तीनदा पुष्पा निकम यांच्यासमोरून चकरा मारल्या. मात्र, मोबाइलवर बोलण्यात त्या गुंग असल्याची संधी साधून, त्याने त्यांच्याजवळ जात, त्यांना एक झापड मारून गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडण्याचा प्रयत्न केला. निकम यांनी चोरट्याचा शर्ट घट्ट पकडून ठेवला. झटापटीत चोरट्याने निकम यांना खाली पाडून लाथा मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. निकम यांनी आरडाओरडा केल्याने संतोष शिंदे, शुभम रक्ताटे, मयूर निकम, पं.स. सदस्य सतीश पाटील यांनी मदतीसाठी येत पाठलाग करून करून चोरास पकडले.

पोलिसांच्या स्वाधीन
नागरिकांनी चोरट्यास पकडून चौकशी केली असता, त्याने ‘माझ्या नादी लागू नका, मला सोडा, नाहीतर तुमचा मर्डर करीन,’ असे धमकावले. मात्र, संतप्त जमावाने चोप देऊन त्यास एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने आपले नाव भारत राजू गडवे (२५ रा.वडगाव कोल्हाटी) असल्याचे सांगितले. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध खुनासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पुष्पा निकम यांच्या फिर्यादीवरून भारतविरुद्ध एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक ए.आर. इंगोले हे करीत आहेत.

Web Title: The woman bravely caught the Mangalsutra thief; Citizens were beaten and handed over to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.