पाणी शेंदताना विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
By Admin | Published: April 6, 2016 12:05 AM2016-04-06T00:05:52+5:302016-04-06T00:42:20+5:30
जालना : पाणी शेंदताना पाय घसरल्याने विहिरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. माळशेंद्रा (ता.जालना) येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
जालना : पाणी शेंदताना पाय घसरल्याने विहिरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. माळशेंद्रा (ता.जालना) येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
मृत महिलेचे नाव प्रमिला शिवाजी जाधव, असे आहे. प्रङ्किला जाधव या दुपारी गावापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतात आल्या होत्या. दुपारी विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढत असताना, तोल गेल्यामुळे त्या विहिरीत पडल्या. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर हा प्रकार शेतात असलेल्या नातेवाइकांच्या लक्षात आला. नातेवाइकांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढून तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले.
मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.दरम्यान, माळशेंद्रा गावात पाणी समस्या अत्यंत तीव्र बनली आहे.
गावातील महिलांना पाण्याच्या एका हंड्यासाठी एक किलामीटर पायपीट करावी लागत आहे. शासकीय विहिरींचा पाणीपुरठा बंद असल्यामुळे गावात टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पाणीटंचाईमुळे अबालवृद्धांचे हाल सुरू आहेत. (वार्ताहर)
जालना औरंगाबाद मार्गावरून जात असताना अज्ञात वाहनाने प्रमोद गुलाब शेलार (३० ) रा. हातवे बु. सनसवाडी ता. भोर जि. पुणे यांच्या वाहनावर धडक दिल्याने प्रमोद यांचा मृत्यू झाला. ही घटना ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जालना औरंगाबाद मार्गावर घडली. उमेश रमेश जाधव यांच्या फिर्यादीवरून कलम २७९, ३०४ नुसार बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हेडकॉन्सटेबल शेख करत आहेत. (प्रतिनिधी)