रांजणगाव मुख्य रस्त्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 08:34 PM2019-01-29T20:34:42+5:302019-01-29T20:34:49+5:30

रांजणगावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सहा महिन्यांपासून रखडलेले काम ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारपासून पुन्हा सुरूकरण्यात आले.

Work on Ranjangaon main road | रांजणगाव मुख्य रस्त्याचे काम सुरू

रांजणगाव मुख्य रस्त्याचे काम सुरू

googlenewsNext

वाळूज महानगर : रांजणगावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सहा महिन्यांपासून रखडलेले काम ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारपासून पुन्हा सुरूकरण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांची गैरसोय दूर होणार आहे.


वाळूज एमआयडीसीतून रांजणगावात जाणाºया या रस्त्याचे अर्धवट काम झाल्यामुळे रांजणगाव फाटा ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ये-जा करणाºया वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. एका बाजूचे काम रखडल्यामुळे या रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होत होती. या रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. या रस्त्याच्या कामासाठी १७ लाखांचा निधी खर्च करून १६० मीटर सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. 

Web Title: Work on Ranjangaon main road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.