Video: वा..! वंदे भारत एक्स्प्रेसची ‘ट्रायल रन’ सुसाट, आता प्रतीक्षा ३० तारखेची

By संतोष हिरेमठ | Published: December 28, 2023 12:40 PM2023-12-28T12:40:45+5:302023-12-28T12:42:44+5:30

जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे ३० डिसेंबर रोजी जालना येथे उद्घाटन करण्यात येणार आहे

Wow..! 'Trial Run' of Vande Bharat Express on Chhatrapati Sambhajinagar and Jalana station | Video: वा..! वंदे भारत एक्स्प्रेसची ‘ट्रायल रन’ सुसाट, आता प्रतीक्षा ३० तारखेची

Video: वा..! वंदे भारत एक्स्प्रेसची ‘ट्रायल रन’ सुसाट, आता प्रतीक्षा ३० तारखेची

छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून मुंबईसाठी सुरु होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची बुधवारी रात्री ‘ट्रायल रन’ घेण्यात आली. त्यानिमित्ताने ही भव्य दिव्य रेल्वे छत्रपती संभाजीनगर आणि जालनारेल्वेस्टेशनवर दाखल झाली.

जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे ३० डिसेंबर रोजी जालना येथे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटनापूर्वी ही रेल्वे ‘ट्रायल रन’साठी बुधवारी रात्री धावली. मनमाडहून ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरला दाखल झाली. त्यानंतरही रेल्वे जालना येथे रवाना झाली. जालना येथून ही रेल्वे पुन्हा मनमाडकडे रवाना झाली.

वंदे भारत एक्स्प्रेसची प्रस्तावित वेळ :
जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस : जालन्यावरून पहाटे ५:०५ वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला सकाळी ५:५३ वाजता येईल आणि ५.:५५ वाजता पुढे रवाना होईल. दुपारी ११:५५ वाजा मुंबईत (सीएसएमटी) पोहोचेल.
- मुंबई - जालना वंदे भारत एक्स्प्रेस : मुंबईहून (सीएसएमटी) दुपारी १:१० वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला सायंकाळी ७:०८ येईल आणि ७:१० वाजता रवाना होईल. जालना येथे रात्री ८:३० वाजता पोहोचेल.
- ही रेल्वे जालना, छत्रपती संभाजीनगर, अंकाई, मनमाड, नाशिक, इगतपुरी, ठाणे, सीएसएमटी येथे थांबेल.

गती ताशी ६४ कि.मी.
जालना ते मनमाड या १७४ कि. मी. मार्गावर रेल्वेची गती ताशी १३० कि. मी.पर्यंत वाढविण्यास मार्चमध्ये परवानगी मिळाली. या मार्गावरील विद्युतीकरणाचेही काम पूर्ण झाले आहे. प्रस्तावित वंदे भारत एक्स्प्रेसची गती ही मुंबईकडे जाताना ताशी ६४ कि. मी. आणि मुंबईहून परत येताना ५९ कि. मी. राहणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Wow..! 'Trial Run' of Vande Bharat Express on Chhatrapati Sambhajinagar and Jalana station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.