कॅनबेरा : न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस क्रेर्न्सने जीवन-मरणाची लढाई जिंकल्यानंतर पहिल्यांदाच संवाद साधला. ३ महिन्यांआधी केर्न्सची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. यावेळी बोलताना तो म्हणाला, मी स्वत:ला भाग्यशाली समजतो की मी मृत्यूच्या दारातून परत येऊ शकलो. या शस्त्रक्रियेनंतर तो काही काळ व्हेंटिलेटर होता. यादरम्यान त्याला आलेल्या स्पाइनल स्ट्रोकमुळे त्याच्या शरीराचा खालच्या भागाला पक्षाघात झाला होता. सध्या तो यातून बरा होतो आहे. एकेकाळी न्यूझीलंड संघाचा अविभाज्य घटक असलेला हा खेळाडू निवृत्तीनंतर हलाचीचे जीवन जगतो आहे.