नांदगाव : सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने कष्टपूर्वक व महागडे बी-बियाणे खते यावर लाखो रु पये खर्च करून केलेल्या पेरण्या वाया गेल्यातच जमा असल्याने भयावह स्थिती उद्भवली असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांचा मोर्चा काढून करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य काउन्सिलचे कॉम्रेड राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे, देवीदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. नांदगाव तालुक्याची अवस्था काळजी करावी अशी असून, तालुक्याच्या ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर शाळेत पदे रिक्त असल्याने शिकवायला शिक्षक नाही, वनजमिनींच्या तालुक्यातून पाठविण्यात आलेल्या अनेक दाव्यांपैकी बहुतांशी दाव्यांचा निर्णय होऊ न शकल्याने ते प्रलंबित आहेत. ते निकाली काढावेत तसेच राज्यघटना संविधान प्रत दिल्ली येथे जाळणाऱ्यांचा निषेध, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या, जनावरांसाठी चारा छावण्या उभारा किंवा चारा उपलब्ध करून द्या, नांदगाव तालुक्याला मांजरपाडा-१ मधून नारपारचे पाणी समन्यायी पद्धतीने द्या, शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करा, कसत असलेल्या वनजमिनी, गायरान जमीन कसणाºयांच्या नावे करा, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या, शेतमजूर, कामगार यांना गावपातळीवरती रोजगार हमीतून कामे उपलब्ध करू द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकरी आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, ३५३ कलमचा गैरवापर थांबवा खोट्या केसेस मागे घ्या, शेतकरी शेतमजुरांना पेन्शन दरमहा सात हजार देण्याचा कायदा करा यांसह इतर मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी यांना सादर करण्यात आले. विजय दराडे, देवचंद सुरसे, शांताराम पवार, जयराम बोरसे, कोंडीराम माळी, निंबा आहेर, प्रकाश भावसार, रामदास जाधव, श्रवण पवार आदी उपस्थित होते. तत्पूर्वी ज्येष्ठ दिवंगत कम्युनिस्ट नेते सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल तसेच मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्यासह आत्महत्या केलेल्या शेतकºयांना भाकप किसान सभेच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.
कष्टकरी शेतमजुरांचा नांदगावला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 4:30 PM
नांदगाव : सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने कष्टपूर्वक व महागडे बी-बियाणे खते यावर लाखो रु पये खर्च करून केलेल्या पेरण्या वाया गेल्यातच जमा असल्याने भयावह स्थिती उद्भवली असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांचा मोर्चा काढून करण्यात आली.
ठळक मुद्देभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य काउन्सिलचे कॉम्रेड राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे, देवीदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.