प्राध्यापकांना नेट-सेट बंधनकारकच
By admin | Published: March 18, 2015 11:04 PM
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) पत्राचा चुकीचा अर्थ लावून राज्यातील काही विद्यापीठांनी २००९ पूर्वी पीएचडी.साठी नोंदणी केलेल्या प्राध्यापकांना नेट-सेट परीक्षांमधून सूट दिली. परंतु, पीएच.डी.धारकांना नेट-सेट परीक्षांची समकक्षता प्रदान केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून या सर्व उमेदवारांना नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे असल्याचे स्पष्ट केले आहे, असे भारतीय इलिजिबल स्टुडेंट, टीचर्स असोसिएशनचे (बेस्टा)चे अध्यक्ष प्रा. अजय दरेकर सांगितले.
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) पत्राचा चुकीचा अर्थ लावून राज्यातील काही विद्यापीठांनी २००९ पूर्वी पीएचडी.साठी नोंदणी केलेल्या प्राध्यापकांना नेट-सेट परीक्षांमधून सूट दिली. परंतु, पीएच.डी.धारकांना नेट-सेट परीक्षांची समकक्षता प्रदान केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून या सर्व उमेदवारांना नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे असल्याचे स्पष्ट केले आहे, असे भारतीय इलिजिबल स्टुडेंट, टीचर्स असोसिएशनचे (बेस्टा)चे अध्यक्ष प्रा. अजय दरेकर सांगितले.दरेकर म्हणाले, 'यूजीसीने २००९ पूर्वीचे पीएच.डी.नोंदणी केलेल्या तसेच पीएचडी. प्रदान झालेल्या अधिव्याख्यात्यांना नेट सेट मधून सूट दिली होती. परंतु, केंद्र शासनाने यावर आक्षेप घेत अशा प्रकारे सूट देण्यास नकार दिला होता. तसेच यूजीसीवर मानव विकास मंत्रालयाचे आदेश बंधनकारक आहेत. यूजीसीने केंद्र शासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही प्राध्यापकांना नेट-सेट परीक्षांमधून सूट देण्यात आली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील काम करणार्या व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यातच एकाच विषयावर उच्च न्यायालयांनी वेगवेगळे निर्णय देणे हे चुकीचे व धक्कादायक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे आता प्राध्यापक नियुक्तीसाठी नेट सेट परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.----------------------------------