IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी

जसप्रीत बुमराह याने भारताकडून सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:57 AM2024-11-23T09:57:22+5:302024-11-23T09:59:10+5:30

whatsapp join usJoin us
Australia vs India, 1st Test Day 2 Australia All Out Team India Lead by 46 Runs In 1st Innings | IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Australia vs India, 1st Test Day 2 : पर्थ कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव १०४ धावांत  आटोपला. भारतीय संघाने पहिल्या डावानंतर या सामन्यात ४६ धावांची अल्प आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात एलेक्स कॅरी १९ (२८) आणि मिचेल स्टार्क ६ (१४)  यांनी ७ बाद ६७ धावांवरून पहिल्या डाव पुढे नेण्यास सुरुवात केली.

बुमराहचा पंजा, अन् स्टार्कची चिवट खेळी

जसप्रीत बुमराहनं कॅरला पंत करवी झेल बाद करत ऑस्ट्रेलिया संघाला ७० धावांवर ८ वा धक्का दिला. विकेटमागे रिषभ पंतनं त्याचा झेल टिपला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या नॅथन लायन याने ५ धावांची भर घालत तंबूचा रस्ता धरला. हर्षित राणाने त्याला चालते केले. तळाच्या फलंदाजीत मिचेल स्टार्कनं चिवट खेळी केली. जोश हेजलवूडच्या साथीनं त्यानं शेवटच्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलिया संघाला १०० पार नेले.

पदार्पणातील सामन्यात हर्षित राणानं पहिल्या डावात घेतल्या ३ विकेट्स

हर्षित राणानं स्टार्कची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव खल्लास केला. स्टार्कनं ११२ चेंडूचा सामना करताना २६ धावांची खेळी केली. ही ऑस्ट्रेलियाकडून सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसरीकडे कार्यवाहू कर्णधार जसप्रीत बुमराह याने भारताकडून सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय हर्षित राणा याने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीनं प्रभावित केले. स्टार्कच्या विकेटसह ऑस्ट्रेलिया पहिला डाव खल्लास करणाऱ्या हर्षित राणा याने पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या. या दोघांशिवाय सिराजनं पहिल्या डावात २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले. 

Web Title: Australia vs India, 1st Test Day 2 Australia All Out Team India Lead by 46 Runs In 1st Innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.