IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?

Mohammad Siraj Bangladesh Fan beaten, IND vs BAN 2nd Test: बांगलादेशच्या फॅनला मारहाण झाली तेव्हा सिराज मैदानात होता, तरीही त्याचे नाव का जोडले जाते? जाणून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 04:53 PM2024-09-27T16:53:45+5:302024-09-27T16:54:37+5:30

whatsapp join usJoin us
Bangladeshi fan tiger Roby abused Mohammed Siraj during Kanpur test social media claims IND vs BAN 2nd Test Day 1 Live Updates | IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?

IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mohammad Siraj, Bangladesh Fan Tiger Roby beaten, IND vs BAN 2nd Test Day 1 Live Updates: कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ झाला. पण एवढ्या कमी कालावधीत खेळतानादेखील मोठा गोंधळ दिसून आला. ग्रीन पार्क स्टेडियमवर एका बांगलादेशी चाहत्याला बेदम मारहाण करण्यात आली. बांगलादेशातील या चाहत्याचे नाव टायगर रॉबी असून त्याला कानपूरमध्ये भारतीय चाहत्यांनी धुतल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर टायगर रॉबी रडताना आणि व्हिवळताना दिसला. अखेर सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, बांगलादेशच्या सुपरफॅन मारहाणीच्या प्रकरणात आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं कनेक्शन दिसत आहे. जाणून घेऊया यामागचे कारण.

मारहाणीत सिराजचं नाव कुठून आलं?

बांगलादेशच्या चाहत्याला मारहाण झाली. पण असं का झालं हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. टायगर रॉबीला का मारले? असा प्रश्न बऱ्याच लोकांचा आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की टायगर रॉबीने सामन्यादरम्यान असे काहीतरी कृत्य केले होते, ज्यामुळे कानपूरमधील चाहते संतप्त झाले होते. आता अधिक विचारणा केली असता असे समजत आहे की बांगलादेशचा हा चाहता मोहम्मद सिराजला शिवीगाळ करत होता. त्यामुळे लोक संतप्त झाले. बांगलादेशचा हा चाहता चेन्नईमध्येही टीम इंडियाच्या विरोधात घोषणा देत होता, असा दावा काही लोकांनी केला आहे.

बांगलादेशी संघाला प्रचंड विरोध

कानपूरमध्ये बांगलादेशी संघाला प्रचंड विरोध झाला. बांगलादेशचा संघ कानपूरला पोहोचला तेव्हा अनेक संघटनांनी रस्त्यावर घोषणाबाजी केली. अलीकडेच, बांगलादेशात सत्तापालटानंतर हिंसाचार झाला होता ज्यात तेथील अनेक हिंदू कुटुंबांचे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यामुळे हा सामना होऊ नये अशी अनेकांची भावना होती. आता बांगलादेशी चाहत्याला झालेल्या मारहाणीचा संबंध त्याच घटनेशी जोडला जात आहे. पण तसे कुठेही सिद्ध झालेले नाही. सिराजला शिवीगाळ केल्याने संतप्त चाहत्यांनी त्याला झोडून काढल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Bangladeshi fan tiger Roby abused Mohammed Siraj during Kanpur test social media claims IND vs BAN 2nd Test Day 1 Live Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.