भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत टी-२० क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद झालीये. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कधीच जे पाहायला मिळालं नाही ती गोष्ट दिल्ली आणि मणिपूर यांच्यातील सामन्यात घडली. आयुष बडोनी याच्या कॅप्टन्सीत दिल्लीच्या संघानं खास विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. जो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
आयुष बडोनीच्या कॅप्टन्सीत दिल्ली संघाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
मणिपूर विरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमधील प्रत्येकाने गोलंदाजी केली. टी-२० क्रिकेटमध्ये याआधी कधीच असं घडलं नव्हते. दिल्लीचा कॅप्टन आयुष बडोनी हा विकेट किपर बॅटर आहे. त्यानेही ग्लोव्ह्ज काढून गोलंदाजी केली. दिल्लीच्या संघाने ११ गोलंदाजांचा वापर केल्यामुळे एकालाही ४ षटकांचा आपला कोटा पूर्ण करता आला नाही. यासह आयुष बडोनीच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने एक खास वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.
प्लेइंग इलेव्हनमधील प्रत्येकाला मिळाली बॉलिंग, कुणी किती ओव्हर केली गोलंदाजी?
मणिपूरच्या संघाने टॉस जिंकून या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीकडून हर्ष त्यागी, दिग्वेश राठी आणि मयंक रावत यांनी प्रत्येकी ३-३ षटके गोलंदाजी केली. याशिवाय आयुष सिंह, अखिल चौधरी आणि आयुष बडोनी यांनी प्रत्येकी २-२ षटके टाकली. याशिवाय संघातील आर्यन राणा, हिम्मत सिंह, प्रियांश आर्या, यश धुल आणि अनुज रावत यांनीही १-१ षटक टाकले.
दिल्लीचा संघ आपल्या गटात टॉपला
मणिपूरच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात १२० धावा केल्या. अवघ्या ४१ धावांत संघाने ६ विकेट्स गमावल्या होत्या. अहमद शाहनं संघाकडून सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय आघाडीच्या फलंदाजी फळीतील उलेनयईनं याने १९ धावा तर कॅप्टन कॅप्टन रेक्स सिंग याने १८ चेंडूत केलेल्या २३ धावा आणि तळाच्या फलंदाजीतील किशन सिंघा याने ११ चेंडूत नाबाद १४ धावांचे योगदान दिले. मणिपूरनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर यश धुल याने ५१ चेंडूत ५९ धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीनं हा सामना ४ विकेट्स राखून जिंकला. या विजयासह 'क' गटात दिल्ली संघाने सलग चार सामन्यातील विजयासह आपल्या गटात अव्वलस्थानावर कब्जा केला आहे.
Web Title: Captain Ayush Badoni Delhi makes history in the Syed Mushtaq Ali Trophy First Time In T20 Cricket History 11 bowlers were used in a single match Against Manipur
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.