India vs England, 2nd Test : चेन्नईवर खेळवला गेलेला हा सामना सर्वांच्या लक्षात राहिल तो आर अश्विनच्या ( R Ashwin) अष्टपैलू कामगिरीमुळे... पहिल्या डावात रोहित शर्मानं ( Rohit Sharma) शतक झळकावून टीम इंडियाचा डाव सावरला. त्यानंतर अश्विननं पाच विकेट्स घेत इंग्लंडला पराभवाच्या दिशेनं ढकललं... त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले असताना अश्विननं कर्णधार विराट कोहलीसह दमदार भागीदारी केली. विराटनंतर अश्विननं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना शतक झळकावलं. शतक, ८ विकेट्स घेणाऱ्या आऱ अश्विनला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आलं. पण, टीम इंडियाच्या या मोठ्या विजयानंतरही अश्विन एका पराक्रमाला मुकला..World Test Championship final scenarios : टीम इंडियाची गरूड भरारी, इंग्लंडला दुहेरी धक्का; मोडले गेले अनेक विक्रम!
इंग्लंडला ४८२ धावांचं आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ १६४ धावांत तंबूत परतला. दुसऱ्या डावात अक्षर पटेलनं ( Axar Patel) पाच विकेट्स घेत पदार्पणाचा सामना गाजवला. अक्षर पटेलनं ६० धावांत पाच विकेट्स घेतल्या. आर अश्विननं ५३ धावांत ३, तर कुलदीप यादवनं २५ धावांत २ विकेट्स घेत विजयात मोठा हातभार लावला. कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेणारा अक्षर हा ९वा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी मोहम्मद निस्सार ( १९३२), वामन कुमार ( १९६१) , सय्यद आबीद अली ( १९६७), दिलीप दोशी ( १९७९), नरेंद्र हिरवानी ( १९८८), अमित मिश्रा ( २००८), आर अश्विन ( २०११), मोहम्मद शमी ( २०१३) यांनी असा पराक्रम केला आहे. भारतीय संघाचा मोठा विजय, विराट कोहलीची MS Dhoniशी बरोबरी
सामन्याचा तिसरा दिवस गाजवला तो आर अश्विननं... दमदार फटकेबाजी करताना त्यानं शतक झळकावून थेट इयान बॉथम, कपिल देव आदी दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावलं होतं. त्याच त्यानं महेंद्रसिंग धोनीचाही मोठा विक्रम मोडला. त्यामुळे कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याला आणखी एक विक्रम खुणावत होता. त्याला एकाच कसोटीत शतक अन् १० विकेट्स असा आगळावेगळा विक्रम करण्याची संधी होती, परंतु अक्षर पटेलनं पाच विकेट्स घेत ती हिरावून घेतली. तरीही अश्विननं एकाच सामन्यात शतक अन् ८ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम दुसऱ्यांदा हा पराक्रम केला आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय आहे. विराट कोहलीवर एका सामन्याच्या 'बंदी'ची टांगती तलवार; तिसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार?
सध्या सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये कसोटीत सर्वाधिक मॅन ऑफ दी मॅच ठरलेला अश्विन पाचव्या स्थानी आहे. स्टीव्हन स्मिथ ( १२), जो रूट ( ११), स्टुअर्ट ब्रॉड ( १०), बेन स्टोक्स/केन विलियम्सन/विराट कोहली ( ९), आर अश्विन ( ८), रॉस टेलर/जेम्स अँडरसन (८ ) असा क्रम येतो. आर अश्विननं मोडला MS Dhoniचा विक्रम, चेन्नई कसोटी गाजवत नोंदवले अनेक पराक्रम!
Web Title: IND vs ENG: R Ashwin will miss the unique record of scoring century and taking 10-wicket haul in same Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.