IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)

१९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत - पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवण्यात येत आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 02:57 PM2024-11-30T14:57:33+5:302024-11-30T14:59:12+5:30

whatsapp join usJoin us
India U19 vs Pakistan U19 Match What A Relay Catch By Mohamed Amaan And Yudhajit Guha crucial 2nd wicket for Team India AND Ayush Mhatre Watch Video | IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)

IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

१९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवण्यात येत आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानच्या संघानं निर्धारित ५० षटकात ७ बाद २८१ धावा केल्या.  पाकिस्तानचा सलामीवीर उस्मान खान आणि कॅप्टन शाहझैब खान यांनी पहिल्या विकेटसाठी १६० धावांची दमदार भागीदारी केली.  भारताकडून आयुष म्हात्रेनं ही जोडी फोडली. त्याने उस्मान खानला ६० धावांवर तंबूचा रस्ता दाखला.

आयुष म्हात्रेसह टीम इंडियाला दुसरी विकेट मिळून देणारा रिले कॅच

या विकेटशिवाय हारुन अर्शदच्या रुपात म्हात्रेनं भारतीय संघाला दुसरी विकेट मिळून दिली. या विकेटसाठी भारतीय कॅप्टन मोहम्मद अमन आणि  युधजीत गुहा यांनी फिल्डिंगमध्ये कमालीचा ताळमेळ दाखवून दिला. कॅच युधजीतच्या नावे झाला असला तरी कॅप्टन मोहम्मद अमन यानेही या कॅचमध्ये मोलाचा वाचा उचलला. हा रिले कॅच दोघांच्यातील कमालीचा ताळमेळ आणि टीम स्पिरिट दाखवून देणारा होता.   

पाकिस्तानकडून शाहजैब खानची दीड शतकी खेळी, पण...

पाकिस्तानकडून शाहजैब खान याने १४७ चेंडूत ५ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १५९ धावांची सर्वोच्च खेळी केली. त्याची ही खेळी पाहून पाकिस्तानचा संघ ३०० पारचा आकडा गाठेल, असे वाटत होते. पण भारतीय गोलंदाजांनी दमदार कमबॅक करून दाखवलं. आयुष म्हात्रेच्या दोन विकेट्सशिवाय समर्थ नागराज याने भारताकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. बेस्ट कॅचसह एका विकेट्समध्ये योगदान देणाऱ्या युधजितनंही आणि किरण घोरमले यांनी गोलंदाजीत प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तळाच्या फलंदाजीतील फ्लॉप शोमुळे पाकिस्तानचा डाव २८१ धावांपर्यंत पोहचू शकला.

 

Web Title: India U19 vs Pakistan U19 Match What A Relay Catch By Mohamed Amaan And Yudhajit Guha crucial 2nd wicket for Team India AND Ayush Mhatre Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.