यंदाचं वर्ष हे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील चुका टाळण्याची हीच ती वेळ... हे जाणूनच टीम इंडियाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे युवा आणि अनुभवी खेळाडूंची सांगड घालून टीम इंडियाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच कर्णधार विराट कोहली प्रत्येक सामन्यात काही तरी नवीन प्रयोग करताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धचा आजचा चौथा सामना हा टीम इंडियासाठी प्रयोगाचाच होता. पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका टीम इंडियानं आधीच जिंकली होती, त्यामुळे भारताच्या दृष्टीनं चौथा सामना हा औपचारिकताच होता. म्हणूनच विराट कोहलीनं तीन हुकमी खेळाडूंना बाकावर बसवून यंग शिलेदारांना संधी दिली. कोहलीचा हा प्रयोग फसला असता पण, धडपडल्यानंतर हार न मानण्याच्या वृत्तीनं टीम इंडियाला आज तारलं.
तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातील स्टार रोहित शर्मा व मोहम्मद शमी यांच्यासह रवींद्र जडेजाला विश्रांती देण्याचा धाडसी निर्णय कोहलीनं आज घेतला. आता याला धाडसी म्हणावा का, तर हो. कारण मालिका जिंकलोय म्हणून नकोते प्रयोग करत फिरणं हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चालत नाही. संघाचे मनोबल उंचावलेले ठेवण्यासाठी विजयपथावरच राहणे कधीही चांगले, त्यामुळे कोहलीनं आजच्या सामन्यात दिग्गजांना विश्रांती देण्याचं धाडस दाखवलं. त्यांच्या जागी संजू सॅमसन, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर हे युवा खेळाडू टीम इलेव्हनमध्ये आले.
आता यात सर्वात जास्त जर कुणी निराश केले असेल तर ते संजू सॅमसननं...
रिषभ पंत अपयशी ठरूनही त्याला सातत्यानं संधी का देता? असा वारंवार सवाल करणाऱ्यांना कोहलीनं
लोकेश राहुलला यष्टिंमागे उभं करून उत्तर दिलेय. त्यात संघ व्यवस्थापनानंही रिषभला तंबी दिली आहे. अशात जर संजूनं मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं अपेक्षित होतं. पण, तसं होताना दिसत नाही. आधी पुण्यात आणि आता वेलिंग्टन येथे संजू अपयशी ठरला. पहिल्या चेंडूवर खणखणीत फटका अन् लगेच दुसऱ्या चेंडूवर झेलबाज... संजूचे हे सातत्य पाहून त्याचे पाठीराखेही निराश झाले असावेत. पण, अजूनही त्याला आपलं स्थान पक्क करण्याची संधी आहे. रिषभ अपयशी ठरेल तेव्हा आपल्याला संधी मिळेल, या भ्रमात त्यानं न राहिलेलं बरं...
मनीष पांडे अन् श्रेयस अय्यर यांचा मौके पे चौका...आजच्या सामन्यात मनीष पांडेनं खऱ्या अर्थानं संधीचं सोनं केलं... टीम इंडियाचे वरचे फलंदाज खेळून जात असल्यानं मनीषला फार खेळण्याची संधी मिळाली नाही. पण, आज प्रयोगाच्या नादात टीम इंडियाची आघाडीची फळी ढेपाळली अन् मनीषनं मौके पे चौका मारला. श्रेयस आज अपयशी ठरला असला तरी त्यानं आतापर्यंत ए ग्रेड रिझल्ट दिला आहे.
शिवम दुबेचं काय करायचं?
हार्दिक पांड्या, केदार जाधव यांच्या गैरहजेरीत शिवमला एक सक्षम अष्टपैलू म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. पण, त्याच्याकडून अपेक्षित तसा खेळ होताना दिसत नाही. त्यात क्षेत्ररक्षणातही त्याच्याकडून बऱ्याच चुका झालेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हार्दिक परतल्यावर शिवमला संघाबाहेर बसावे लागेल हे निश्चित आहे. केदारच्या खेळण्यावर संभ्रम असले तरी हार्दिकला बॅकअपम्हणून तो आघाडीवरच आहे.
जसप्रीत बुमराहच्या खांद्याला खांदा लावणारा जोडीदार कोण?
दुखापतीतून सावरत पुनरागमन करणारा जसप्रीत बुमराह आजही टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याची कामगिरी पहिल्यासारखी भरीव होताना दिसत नसली तरी तो कोणत्या क्षणी कमबॅक करेल याचा नेम नाही. त्याच्या जोडीला सध्या मोहम्मद शमी हाच अनुभवी आणि सक्षम साथीदार आहे. शार्दूल ठाकूर व नवदीप सैनी यांचा खेळ वाईट नाही, परंतु त्यांना अजून बराच पल्ला गाठावा लागेल. त्यात भुवनेश्वर कुमार तंदुरुस्त होऊन संघात परतल्यास या दोघांपैकी कुणाचातरी बळी जाईल हे पक्कं आहे.
एकूण काय, तर संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर यांनी आज मिळालेली संधी गमावली... शार्दूलनं गेल्या काही सामन्यात फलंदाज म्हणून उपयुक्त ठरत होताच. पण, आज त्यानं गोलंदाज म्हणून कमबॅक केले आणि संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. आज आपण धडपडलो, पण नव्या दमानं उभं राहून जिंकलो...
Super Over मध्ये १४ पैकी १० धावा पहिल्या दोन चेंडूतच, पण नंतर...
Super Over : टीम इंडियाचा Super विजय, शार्दूल ठाकूरनं फिरवला सामना
रिषभ पंत अन् संजू सॅमसन अपयशी, चाहत्यांची धोनीला साद; घ्या पुरावा
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह 'हरवलाय'?
नाणेफेकीपूर्वीच कर्णधाराची माघार, खांद्याला झाली गंभीर दुखापत
रिषभ पंत अन् संजू सॅमसन अपयशी, चाहत्यांची धोनीला साद; घ्या पुरावा
न्यूझीलंडच्या मानगुटीवर 'Super Over'चं भूत; पाहा कधी व कोणी केलं पराभूत
Web Title: India vs New Zealand : India vs New Zealand : What Team India learn after back to back super over victory; Who impressed more?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.