भारतीय संघानं ट्वेंटी-20 मालिकेत न्यूझीलंडवर निर्भेळ यश मिळवले. आता दोन्ही संघांनी आपला मोर्चा वन डे मालिकेकडे वळवला आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील यशानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावलेले आहे. पण, त्यांच्या या आनंदात दुखापतीचा खडा पडला आहे. टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मानं वन डे आणि कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. त्याच्याजागी वन डे संघात मयांक अग्रवालला, तर कसोटी संघात लोकेश राहुल व शुबमन गिलला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Rohit Sharma दुखापतग्रस्त, टीम इंडियातील रिक्त स्थान भरण्यासाठी चौघे शर्यतीत!
NZ Vs IND : भारतीय संघाचे मालिकेत निर्भेळ यश, पण आयसीसीनं ठोठावला दंड
या मालिकेत लोकेश राहुल फलंदाज आणि यष्टिरक्षक अशा दुहेरी भूमिकेत होता. या दोन्ही भूमिका त्यानं चोख पार पाडल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये लोकेश अव्वल स्थानी आहे. त्यानं 56 च्या सरासरीनं 2 अर्धशतकांसह 224 धावा चोपल्या. विशेष म्हणजे या मालिकेतून दोनशेहून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. लोकेशनंतर जर कोणाची बॅट तळपली असेल तर ती हिटमॅन रोहित शर्माची... त्यानं चार ट्वेंटी-20 सामन्यांत दोन अर्धशतकं झळकावली. पण, पाचव्या सामन्यात रोहितच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावं लागलं. रोहितनं त्या सामन्यात 41 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून 60 धावा चोपल्या. त्यानं आता आगामी वन डे आणि कसोटी मालिकेतून माघार घेतल्याच्या वृत्ताला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दुजोरा दिला.
हा रोहितच्या कसोटी कारकिर्दीला धक्का
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की,''पोटरीच्या दुखापतीमुळे रोहित शर्मानं न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे.'' त्यामुळे रोहितच्या कसोटी कारकिर्दीला पुन्हा एक धक्का बसला आहे. गतवर्षी रोहितनं कसोटी मालिकेत दमदार खेळ केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्यानं दोन शतकं आणि एक द्विशतक झळकावत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे रोहितही न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्यासाठी उत्सुक होता.
कसोटी कारकिर्दीत प्रथमच सलामीला आला अन्...
रोहित शर्मा गतवर्षी प्रथम कसोटी कारकिर्दीत सलामीला खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित सलामीला आला. पहिल्याच सामन्यात त्यानं 176 धावांची वादळी खेळी केली. त्याचा हा झंझावात दुसऱ्या डावातही पाहायला मिळाला. रोहितनं दुसऱ्या डावात 127 धावा चोपल्या. त्यानंतर रांची कसोटीत त्यानं 212 धावांची खेळी केली. कसोटीत सलामीला येताना त्यानं 5 सामन्यांत 92.66 च्या सरासरीनं 556 धावा चोपल्या. रोहितनं एकूण कसोटी कारकिर्दीत 32 सामन्यांत 46.54 च्या सरासरीनं 2141 धावा केल्या आहेत. त्यात 6 शतकं आणि 10 अर्धशतकं झळकावली आहेत.
ICC T20I Rankings मध्ये KL Rahulची गरूड झेप; विराट, रोहित यांनाही टाकलं मागे
लोकेश राहुलचा एक्स्ट्रा कव्हरवरून षटकार अन् विंडीज दिग्गजाचं बेस्ट ट्विट!
Video : सचिन तेंडुलकरचं 'चॅलेंज' विनोद कांबळीनं केलं पूर्ण
पाकिस्तानमध्ये येऊन खेळा, शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला चॅलेंज!
विराट कोहली अन् इम्रान खान यांच्यात साम्य; संजय मांजरेकरचं विधान
विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'
Web Title: India vs New Zealand : Rohit Sharma has been ruled out of ODI and Test series against New Zealand: BCCI Source
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.