India Vs West Indies : भारतीय संघ निवड समितीवर 'दादा'ची टीका, सर्वांना खूश ठेवण्याचा आटापिटा सोडा

नवी दिल्ली, भारत वि. वेस्ट इंडिज : वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील अपयश विसरून टीम इंडिया पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 11:29 AM2019-07-24T11:29:15+5:302019-07-24T11:30:11+5:30

whatsapp join usJoin us
India Vs West Indies : Sourav Ganguly slams West Indies squad selection; Stop making everyone happy | India Vs West Indies : भारतीय संघ निवड समितीवर 'दादा'ची टीका, सर्वांना खूश ठेवण्याचा आटापिटा सोडा

India Vs West Indies : भारतीय संघ निवड समितीवर 'दादा'ची टीका, सर्वांना खूश ठेवण्याचा आटापिटा सोडा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, भारत वि. वेस्ट इंडिज : वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील अपयश विसरून टीम इंडिया पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) तीन वेगवेगळे संघ जाहीर केले. या दौऱ्यासाठी वन डे संघात शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याला संधी न मिळाल्यानं माजी कर्णधार सौरव गांगुलीनं आश्चर्य व्यक्त केले. 3 ऑगस्टपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाचे नेतृत्व विराटकडेच! धवनचे पुनरागमन, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ जाहीर

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या या संघात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याशिवाय प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांनाही विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला आपली छाप पाडण्याची संधी आहे.

अजिंक्य रहाणे कसोटी संघाचा उपकर्णधार आहे, परंतु तो वन डे संघात असायला हवा होता. शिवाय भारत A संघाच्या विंडीज दौऱ्यात शुबमनने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यालाही वन डे संघात स्थान मिळायला हवे होते, असे मत गांगुलीनं व्यक्त केलं.


भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या गांगुलीनं यावेळी निवड समितीवर ताशेरे ओढले. त्यानं सांगितले की,''तीनही प्रकारच्या संघात समान खेळाडू निवडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खेळाडूंना सातत्य राखण्यात मदत होईल आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. सध्याच्या घडीला मोजकेच खेळाडू तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. सर्वांना खूश करण्याच्या प्रयत्न करू नका, देशासाठी चांगले खेळाडू निवडा.'' 

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ  - 
टी-20  - विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा,  वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार,  खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी 

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ  -
वनडे -  विराट कोहली ( कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी 

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ  -
कसोटी  - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव 

Web Title: India Vs West Indies : Sourav Ganguly slams West Indies squad selection; Stop making everyone happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.