IPL 2020 : CSK बाबतीतचं वृत्त चुकीचं; दोन खेळाडूंसह 13 सदस्य अजूनही कोरोना पॉझिटिव्ह

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमातही जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला एकमागून एक धक्के बसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 08:24 PM2020-09-01T20:24:11+5:302020-09-01T20:24:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : 13 members of Chennai Super Kings squad still COVID positive, all others test negative | IPL 2020 : CSK बाबतीतचं वृत्त चुकीचं; दोन खेळाडूंसह 13 सदस्य अजूनही कोरोना पॉझिटिव्ह

IPL 2020 : CSK बाबतीतचं वृत्त चुकीचं; दोन खेळाडूंसह 13 सदस्य अजूनही कोरोना पॉझिटिव्ह

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमातही जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला एकमागून एक धक्के बसत आहे. दोन खेळाडूंसह स्टाफ सदस्य अशी एकूण 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उपकर्णधार सुरेश रैनानं घेतलेली माघार CSKसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं टेंशन वाढलेलं होतं. दीपक चहर आणि ऋतुराज यांच्यासह सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं संघातील अन्य सदस्यांना पुन्हा क्वारंटाईन व्हावं लागलं आणि त्यामुळे त्यांना सरावासाठीही मैदानावर उतरता आलेलं नाही. त्यात मंगळवारी ही 13 जणं कोरोना निगेटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले होते. पण, हे वृत्त चुकीचं असल्याचे CSKच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. 

त्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी

मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले 13 सदस्य अजूनही कोरोनाग्रस्त आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य सदस्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती CSKच्या सूत्रांनी दिली. ''ती 13 जणं सोडून संघातील अन्य सदस्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे,''असे सूत्रांनी सांगितले. या 13 जणांची कोरोना चाचणी दोन आठवड्याच्या क्वारंटाईन कालावधीनंतर केली जाणार आहे. या सदस्यांमध्ये दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंचा समावेश आहे.

IPL 2020 : Bio-Bubble नियमांचं पालन करा; इथे खेळायला आलोय, मजा करायला नाही - विराट कोहली   

दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फॅफ ड्यू प्लेसिस आणि लुंगी एऩगिडी मंगळवारी पहाटे दुबईत दाखल झाले आहेत. आता त्यांना 6 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. ते आता सहा दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत राहणार आहेत. 

आठ फ्रँचायझींच्या ताफ्यात नवे भीडू; जाणून घ्या तुमच्या आवडत्या संघात कोणता नवीन खेळाडू खेळणार

Web Title: IPL 2020 : 13 members of Chennai Super Kings squad still COVID positive, all others test negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.