सलामीच्या आणि नवव्या जोडीनं केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ईडन पार्कच्या मैदानाचा आकार पाहता टीम इंडियाचे धुरंधर सहज पार करतील, असा आत्मविश्वास सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण, सामना सुरू झाला अन् अवघ्या 20 षटकातं चेहऱ्यावरील त्या आत्मविश्वासाचे निराशेत रुपांतर झाले. भारताचे आघाडीचे पाच फलंदाज 96 धावांवर माघारी परतले. श्रेयस अय्यर ( 52) आणि रवींद्र जडेजा यांनी आशेचा किरण जागवला. पण, तोही किवी गोलंदाजांच्या वेगवान वाऱ्यासमोर टिकू शकला नाही. मात्र, चमत्कार घडावा तसा नवदीप सैनी टीम इंडियासाठी धावून आला. जडेजा व नवदीप सैनीनं आठव्या विकेटसाठी दमदार भागीदारी करताना टीम इंडियाला अश्यक्यप्राय विजय मिळवून दिलाच होता. पण, किवींनी विजय खेचून आणला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात रवींद्र जडेजानंकपिल देव व महेंद्रसिंग धोनी या दोन दिग्गजांचा विक्रम मोडला.
लढलो, पण हरलो! जडेजा-सैनीच्या खेळीनं मात्र मनं जिंकली
रॉस टेलरनं पुन्हा एकदा जबरदस्त खेळी करताना भारतीय गोलंदाजांना हतबल केलं. दमदार सुरुवातीनंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीनं शरणागती पत्करली. 1 बाद 142 वरून न्यूझीलंडची अवस्था 7 बाद 187 अशी दयनीय झाली होती. पण, त्यानंतर रॉस टेलर खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्यानं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांच्या दमदार ( 93 धावा) सलामीनंतरही किवींच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. रॉस टेलरनं पुन्हा एकदा अखेरच्या षटकांत उपयुक्त खेळी करत जोरदार पलटवार केला. त्यानं पदार्पणवीर कायले जॅमिसनला सोबत घेताना नवव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडनं 8 बाद 273 धावा केल्या. जॅमिसन 24 चेंडूंत 25 धावांवर ( 1 चौकार व 2 षटकार) नाबाद राहिला. रॉसनं 74 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 73 धावा केल्या
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी ढेपाळली. पृथ्वी शॉ ( 24), मयांक अग्रवाल ( 3), विराट कोहली ( 15), लोकेश राहुल ( 4) आणि केदार जाधव ( 9) यांना माघारी पाठवून न्यूझीलंडनं विजयाचा पाया रचला होता. पण, श्रेयस अय्यरनं फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळी केली. त्यानं 57 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 52 धावा केल्या. पण, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर चुकीचा फटक मारून तोही माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांनी आठव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करताना सामन्यातील चुरस कायम राखली होती. कायले जेमीसननं ही जोडी संपुष्टात आणली. सैनीनं 49 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 45 धावा केल्या.
जडेजानं सामन्याची सर्व सूत्र हाती घेताना अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 67 चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. समजुतदारीनं खेळून सामना तोंडाशी आणण्यात हातभार लावणाऱ्या युजवेंद्र चहलनं घाई केली. चहल 12 चेंडूंत 10 धावा करून माघारी परतला. त्यानंतर जडेजाही बाद झाला आणि भारताचा संपूर्ण संघ 251 धावांत तंबूत परतला. या सामन्यात सातव्या क्रमांकावर सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम जडेजानं नावावर केला. त्याचं सातव्या क्रमांकावरील 7 वं अर्धशतक ठरलं. महान कर्णधार
कपिल देव आणि कॅप्टन कूल यांनी या क्रमांकावर प्रत्येकी 6 अर्धशतकं झळकावली आहेत.
न्यूझीलंडवर अशी वेळ का आली? क्षेत्ररक्षक प्रशिक्षकालाच मैदानावर फिल्डींग करावी लागली
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अंपायरवर भडकला, पण का?
जसप्रीत बुमराहला नेमकं झालंय तरी काय? आजच्या सामन्यात नोंदवला नकोसा विक्रम
टीम इंडियाचे कमबॅक; पण, न्यूझीलंडच्या रॉस टेलरचा जबरदस्त पलटवार
Web Title: New Zealand vs India, 2nd ODI : Ravindra Jadeja broke Kapil dev and MS dhoni record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.